शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत समस्यांना माथेरानकरांनी फोडली वाचा

By admin | Updated: May 21, 2016 03:05 IST

माथेरानमधील वीज, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग, मिनी बस अशा अनेक समस्या मांडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले

नेरळ : माथेरानमधील वीज, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग, मिनी बस अशा अनेक समस्या मांडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला माथेरानकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंतु या उपक्र माला एकही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने माथेरानकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हे शासकीय अधिकारी किती जागरूक आहेत हे यावरून दिसून आले.माथेरानमधील असेम्बली हॉलमध्ये शुक्रवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’चे हरून शेख यांनी प्रस्तावना करून या कार्यक्र माला सुरुवात केली. पाणीपुरवठ्यावर चर्चा करताना सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे म्हणाले, माथेरानला पाणीपुरवठा केली जाणारी पाइपलाइन आदिवासी लोक फोडत आहेत. जास्त प्रमाणात पाणी हॉटेलला व व्हीआपी लोकांना पुरविले जात असल्याने माथेरानकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून प्रचंड बिल आकारले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच २०१० मध्ये २४ कोटी रुपयांची मंजूर केलेली पाणी योजना पूर्ण झाली नाही. ई-रिक्षा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. माथेरानमध्ये अनेक महिन्यांपासून महावितरणचा खेळखंडोबा सुरू असल्याने माथेरानकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे माथेरान मिनी ट्रेन मार्ग बंद झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तो पुन्हा तयार करण्यासाठी सुमारे १९ महिन्यांचा कालावधी लागला होता. त्यावेळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे माथेरानला माथेरान-धोधानी हा पर्यायी रस्ता होणे काळाची गरज असल्याचे अरविंद शेलार यांनी यावेळी सांगितले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकला तरच बंद केलेली मिनी ट्रेन सुरु होईल व माथेरानचा विकास होईल, असे माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत नमूद केले. माथेरानच्या समस्या जाणून घेतल्यानंतर ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी माथेरानमध्ये २० वर्षांपासून जाणवत असलेल्या समस्या अधिकाऱ्यांची झोप उडेल अशा पध्दतीने मांडण्यात येतील व सहा महिन्यांत अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न ‘लोकमत’च्या माध्यमातून केले जातील, असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक कुलदीप जाधव, सुनील शिंदे, प्रकाश सुतार, प्रवीण कोळंबे, प्रदीप घावरे, शकील पटेल, नागेश कदम, चंद्रकांत काळे, शिवाजी शिंदे, गणेश सुतार, सूर्यकांत कारडे, ‘लोकमत’ परिवारातील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)विकासाला लागली नजर च्माथेरानच्या विकासाला नजर लागली असून, माथेरानची लोकसंख्या दर दहा वर्षांनी कमी होत आहे. अनेक माथेरानकरांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे व अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे माथेरानचा विकास भकास झाल्याचे माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी या उपक्र मात सांगितले.