शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांक नोकरदारांच्या समस्यांना वाचा फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 06:45 IST

राज्य शासनाच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या अल्पसंख्यांक समाजातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना येणाºया विविध अडचणी

जमीर काझी मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या अल्पसंख्यांक समाजातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना येणा-या विविध अडचणी, समस्या मांडण्यासाठी आता त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. संबंधित विभागप्रमुखांकडून दर तीन महिन्यांतून एकदा त्याबाबत बैठक घेऊन, त्यांच्या तक्रारी, प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या जाणार आहेत. तसा आदेश राज्य सरकारने दिला आहे.सामान्य प्रशासन विभागाने त्याबाबतचा अध्यादेश नुकताच लागू केला आहे. सर्व शासकीय विभागाच्या प्रशासकीय व कार्यालय विभागप्रमुखांसाठी हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे. महाराष्टÑ राज्य अल्पसंख्यांक अधिकारी - कर्मचारी असोसिएशनच्या वतीने या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर राज्य सरकारने त्याची दखल घेतली.राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाºयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, प्रत्येक विभागाच्या प्रशासकीय विभागप्रमुखांची दर सहा महिन्यांनी, तर कार्यालयीन विभागप्रमुखांची दर तीन महिन्यांतून एकदा बैठक घेतली जाते. २०११ पासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर अल्पसंख्यांक समाजाच्या अधिकारी-कर्मचाºयांसाठीही बैठक घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती. त्याबाबत मुख्य सचिव सुमित मलिक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार, आता या समाजातील अधिकारी-कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागातील प्रशासकीय प्रमुखाने सहा महिन्यांतून एकदा, तर कार्यालय विभागप्रमुखाने तीन महिन्यांतून एकदा आपापल्या स्तरावर बैठक घ्यायची आहे. या बैठकीला महाराष्टÑ राज्य अल्पसंख्यांक अधिकारी-कर्मचारी असोसिएशनचा प्रतिनिधीही हजर राहतील. बैठकीत संबंधितांच्या अडचणींबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करून समस्या निकाली काढण्याच्या सूचना, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, संचालक आदींना देण्यात आल्या आहेत. या समस्यांवर होणार चर्चाअल्पसंख्यांक समाजातील अधिकारी-कर्मचाºयांच्या सेवाशर्ती, पदोन्नती, बदल्या, गोपनीय अहवाल, तसेच कामाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक दिल्या जाणाºया त्रासाबाबत संबंधितांना वरिष्ठांकडे तक्रार करता येईल.अधिकाºयांकडून तक्रारींची दखल घेण्यात येऊन शक्यतो, त्या बैठकीतच प्रश्न निकाली लावण्यावर भर देण्यात येईल.स्थानिक स्तरावर प्रश्न सोडविणे शक्यमागासवर्गीय अधिकारी-कर्मचाºयांच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समाजातील कर्मचाºयांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी विभागप्रमुखांकडून बैठक घेण्याचा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे संबंधितांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सोडविण्यात येतील. संघटनेच्या माध्यमातून या मागणीसाठी गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. बैठकीत आमचा प्रतिनिधीही हजर राहतील. - हाजी जतकर (अध्यक्ष, महाराष्टÑ राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोसिएशन)