शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत परीक्षांचेही ‘पुनर्मूल्यांकन’

By admin | Updated: June 29, 2016 02:00 IST

पुनर्मूल्यांकनासोबत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची फोटोकॉपी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

मुंबई : अंतर्गत परीक्षांच्या गुणांचेही पुनर्मूल्यांकन होणार असून, पुनर्मूल्यांकनासोबत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची फोटोकॉपी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७पासून हा निर्णय अंमलात आणणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.बाह्य परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि फोटोकॉपीची सुविधा उपलब्ध आहे. तशी सुविधा अंतर्गत परीक्षांसाठी नव्हती. अनेकदा प्रकल्प सादर करूनही गुण देत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुणांमध्येही पारदर्शकता यावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. १६ मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. ज्या विद्यार्थ्यांनी मार्च-एप्रिल २०१६च्या सहाव्या सत्रासाठी प्रकल्प सादर केले आहेत, त्या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे; शिवाय शैक्षणिक २०१६-१७ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षांच्या सर्व विषयांच्या गुणांचे पुनर्मूल्यांकन आणि फोटोकॉपीची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे कुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)>तेरावी प्रवेशासाठी आॅनलाइन संधीतेरावी प्रवेशासाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी २ ते १५ जुलै या कालावधीत सुरू राहणार आहे. तेरावी प्रवेशासाठी विद्यापीठाने आॅनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी अनिवार्य केली आहे. १४ ते २५ जून या कालावधीत ही नोंदणी करणे अनिवार्य होते. पण अजूनही विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली नसेल, तर ती करावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर ज्या महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक आहेत, त्या भरण्यासाठी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी २ ते १५ जुलै या कालावधीत प्री इन्रोलमेंट लिंक सुरू ठेवण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव एम.ए. खान यांनी स्पष्ट केले.