शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

रद्द नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार

By admin | Updated: January 2, 2017 18:44 IST

३० डिसेंबरपर्यंत बदलवू किंवा निर्धारित बँकेत जमा करू न शकलेले नागरिक या नोटा रिझर्व्ह बँकेत ३१ मार्च २०१७ पर्यंत जमा करू शकतील

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 2 - रद्द झालेल्या ५०० व १००० च्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बदलवू किंवा निर्धारित बँकेत जमा करू न शकलेले नागरिक या नोटा रिझर्व्ह बँकेत ३१ मार्च २०१७ पर्यंत जमा करू शकतील, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दिले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने आता या नोटा स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ही सवलत केवळ विदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी (एनआरआय) असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी नागपुरातील आरबीआयच्या कार्यालयात जुन्या नोटा जमा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली. नागरिकांजवळ असलेल्या जुन्या नोटा ते ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये बदलवू किंवा जमा करू शकणार होते. जे नागरिक ठरलेल्या मुदतीत त्यांच्याजवळच्या जुन्या नोटा बदलवू अगर खात्यात जमा करू शकले नाहीत त्यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात त्या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची सवलत पंतप्रधानांनी त्यावेळी जाहीर केली होती. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने तसे परिपत्रकही काढले होते. प्रसार माध्यमांकडूनही त्यानुसार प्रचार करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत अनेक वेळा नवीन घोषणा करणाऱ्या सरकारप्रमाणेच रिझर्व्ह बँकेने नवीन परिपत्रक काढून रद्द झालेल्या नोटा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. या ना त्या कारणाने ५० दिवसांत जुन्या नोटा बदलू अगर खात्यात जमा करू न शकलेल्या नागरिकांनी ३० डिसेंबरची मुदत संपल्यानंतर सोमवारी रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतली. दोन दिवस सुट्या असल्याने सोमवारी बँक उघडताच नागपूरच्या रिझर्व्ह बँक कार्यालयासमोर लोकांची गर्दी जमा झाली. रद्द झालेल्या ५०० व १००० च्या नोटा घेऊन काही लोक त्या बदलण्यासाठी तर काही त्या नोटा खात्यात जमा करण्यासाठी आले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने या नोटा जमा करण्यास स्पष्ट नकार दिला. ३१ मार्चपर्यंतची सवलत विदेशात राहणारे भारतीय किंवा ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरच्या काळात विदेशात असलेल्या नागरिकांसाठीच असल्याचे नोटीसच बँकेने कार्यालयासमोर लावले आहे. त्यामुळे नोटाबदलीसाठी बँकेत आलेल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आरबीआयने वेळेवर अशाप्रकारची नोटीस लावून सामान्य नागरिकांना फसविल्याचा आरोप नागरिकांनी केला.