शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयचे अधिकारीच सुट्टीवर

By admin | Updated: November 13, 2016 21:52 IST

केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी, रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी, रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले. मात्र नोटा बदलून घेण्यासाठी देशातील कोट्यावधी नागरिक बँकांसमोर रांगा लावून उभे असताना रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय)अधिका-यांनी सुट्टी घेतली,त्यामुळेच बँकांपर्यंत पैसे पोहचले नाहीत,असा आरोप करत आॅल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांंनी शासनाचे या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर देशातील सर्व नागरिक आणि बँक कर्मचा-यांनी सहकार्याची भूमिका दाखवत बँकांचे व्यवहार सुरू केले. नोटा बंदच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार बँक कर्मचा-यांनी सुट्टी रद्द करून शनिवारी व रविवारी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत काम केले. नागरिकांनी संयम दाखवत निमुटपणे बँकांच्यासमोर रांगा लावल्या. मात्र आरबीआयकडून बँकांकडे रक्कम न आल्याने ती नागरिकांना देता आली नाही. त्यामुळे संपूर्ण देश कामाला लागलेला असताना आरबीआयच्या अधिका-यांनी बँकांकडे रक्कम पाठवली नाही,असा आरोप उटगी यांनी केला. तसेच संबंधित प्रकाराची चौकाशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे लोकमतशी बोलताना सांगितले.उटगी म्हणाले, काळा पैसा बाहेर यावा,भष्टाचार कमी व्हावा आणि दहशतवादाला आळा बसावा या उद्देशाने केंद्र शासनाने नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यात राष्ट्रीयकृत बँकांसह सर्व सहकारी बँकांनीही सहकार्य करण्याची भूमिका दाखवली. मात्र अनेक बँकांकडे पैसेच पोहचलू शकले नाही. परिणामी नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे ज्या अधिकारी घेतलेल्या सुट्टीमुळे बँकांपर्यंत पैसे पोहचू शकले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.