शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भर कोर्टात अश्विन नाईकवर गोळया झाडणा-या रवींद्र सावंतचा दयनीय शेवट

By admin | Updated: July 3, 2016 13:49 IST

अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड दरारा निर्माण करणारा कुख्यात शार्प शूटर रवी ऊर्फ रवींद्र शांताराम सावंत अखेरच्या दिवसात कमालीचा दयनीय जीवन जगला.

नरेश डोंगरे  

नागपूर, दि. ३ -  अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक याच्यावर कोर्टाच्या परिसरात दिवसाढवळ्या गोळी झाडून अवघ्या २२ व्या वर्षी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड दरारा निर्माण करणारा कुख्यात शार्प शूटर रवी ऊर्फ रवींद्र शांताराम सावंत अखेरच्या दिवसात कमालीचा दयनीय जीवन जगला. ज्याच्या गळ्यातील कधीकाळी रवी सावंत ताईत होता, तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सावंतच्या अखेरच्या दिवसात आसपासच (मध्यवर्ती कारागृहात) होता, अवतीभवती अनेक गुन्हेगार होते. 
 
मात्र, त्याच्यासोबत यापैकी प्रत्यक्ष, ना भाईजगत होते, ना कुणी आप्तस्वकीय. होय, शुक्रवारी दिवसभर छातीतील वेदनांनी तडफडून अखेर रवी सावंतने शुक्रवारी रात्री मेडिकलमध्ये प्राण सोडले. सावंतने जिवंतपणी अनेक गोष्टीसाठी जीवघेणी प्रतीक्षा अनुभवली. मृत्यूनंतरही त्याच्या वाट्याला नातेवाईकांची प्रतीक्षा आली आहे. 
 
मुंबई बॉम्बस्फोटानंतर मुंबईतून दाऊद कराचीत पळून गेला तर, छोटा राजनने मलेशियात हातपाय पसरले. त्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये सर्वाधिक प्रभाव डॉन अरुण गवळीच्या टोळीचा होता. त्याला काटशह देण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमर नाईकच्या टोळीला धडा शिकवण्याचा कट गवळी टोळीने रचला. 
 
त्यानुसार, १० एप्रिल १९९४ ला गवळी टोळीचा शूटर रवींद्र सावंत याने कोर्टाच्या परिसरात शिरून अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईक याच्यावर गोळी झाडली. डोक्याला मागच्या बाजूने गोळी लागल्याने अश्विन या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. सोबतच त्याच्या बाजूला असलेले तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.
 
वकिलाच्या वेशात केला होता हल्ला 
वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार, अश्विनचा गेम करण्यासाठी कुख्यात सावंत वकिलासारखा वेश परिधान करून कोर्टाच्या आवारात शिरला होता. या घटनेमुळे अंडरवर्ल्डसह देशभरात खळबळ उडाली होती. सावंतने झाडलेली गोळी डोक्यातून आरपार निघूनही  अश्विन वाचला. मात्र, त्याच्या कंबरेखालचा भाग अधू झाला होता. नाईक टोळीही बॅकफूटवर गेली होती. या हल्ल्यामुळे गवळी टोळीसोबत अवघ्या २२ वर्षांच्या रवींद्र सावंतचीही दहशत तीव्र झाली होती. मोठमोठे गुन्हेगारही आता सावंतच्या नावाने थरथरत होते. त्यामुळे त्याच्यावर टाडा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कोर्टात जलदगतीने प्रकरण चालविण्यात आले. ७ सप्टेंबर १९९६ ला या गुन्ह्यात सावंतला कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी तो केवळ २४ वर्षांचा होता. 
 
त्यावेळी कारागृहांमध्येही अंडरवर्ल्ड टोळ्यांच्या गुंडांमध्ये धुसफूस अन् हल्ले सुरूच होते. त्यामुळे १९ सप्टेंबरला सावंतला नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. अंडरवर्ल्ड अन् अय्याशीच्या जीवनाची चटक असलेल्या सावंतला प्रारंभी आतल्या आत बºयापैकी रसद मिळत असल्याने त्याने १४ वर्षे कारागृहात काढली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करून आपण १४ वर्षे शिक्षा भोगल्यामुळे आता मुक्त करण्यात यावे, अशी याचिकेतून मागणी केली. मात्र, त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप बघता कोर्टाने त्याची ही याचिका फेटाळून लावली. तेव्हापासून सावंत कमालीचा निराश झाला होता.
  
येथील मध्यवर्ती कारागृहात मुंबईतील अनेक खतरनाक टोळ्यांमधील गुंड बंदिस्त आहेत. सावंत ज्याच्या गळ्यातील कधीकाळी ताईत होता, तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) सुद्धा गेल्या तीन-चार वर्षांपासून याच कारागृहात बंदिस्त आहे. मात्र, सावंतला (बंदी क्र. सी-४७४०) टशन, भाईगिरीचा विसर पडल्यासारखाच झाला होता. कारागृहाच्या सूत्रांनुसार, त्याची अलीकडे विड्यांच्या थोटकांसाठीही मारामार होती. त्याची बाहेर जाण्यासाठी नुसती खटपट सुरू होती. 
 
ठराविक कारणे सांगून तो फर्लो आणि पॅरोलवर (संचित रजेवर) मुंबईला आपल्या जोगेश्वरी (पूर्व) तील  एमएचबी कॉलनी, मेघवाडीत जायचा. दोन महिन्यांपूर्वीच तो मुंबईला जाऊन आला होता.  कारागृहाच्या अधिका-यांनुसार, फुफ्फुसाचा विकार जडलेल्या सावंतला आपल्या नातेवाईकांची नेहमीच प्रतीक्षा असायची. २० वर्षांपासून कारागृहात बंदिस्त असल्याने तो खटपट करत होता. कारागृहातून कधी एकदा आपल्याला कायमची सुटी मिळते, असे त्याला झाले होते. मात्र शिक्षेतून मुक्ती मिळण्याऐवजी त्याला जीवनातून कायमचीच मुक्ती मिळाली. शुक्रवारी सकाळपासून छातीत दुखत होते. 
 
रात्री ७ वाजता प्रकृती खालावल्याने त्याला कारागृहातून मेडिकलमध्ये नेण्यात आले. मात्र, रात्री ९ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. त्याचे नातेवाईक अद्याप नागपुरात आले नाही. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तसाच पडून आहे. एका चालत्याबोलत्या थराराचा असा भयावह आणि दयनीय शेवट गुन्हेगारांना धडकी भरविणारा आहे.