शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र गायकवाड यांचे विमान तिकीट पुन्हा रद्द

By admin | Updated: March 29, 2017 03:42 IST

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत

मुंबई/ दिल्ली : एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. गायकवाड यांनी काढलेले मुंबई-दिल्ली असे तिकीट एअर इंडियाने रद्द केले आहे. गायकवाड यांनी एआय-८०६ या बुधवारी सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या विमानाचे तिकीट बूक केले. मात्र, कंपनीने ते तिकीट रद्द केले.एअर इंडियासह सात विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. खा. गायकवाड यांना पुन्हा विमानाने प्रवास करू देण्याची मागणी करणारा विशेषाधिकार प्रस्ताव शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी लोकसभाध्यक्षांकडे दिला. मात्र सरकारने ‘कोणाचेही गैरवर्तन हे विशेषाधिकाराखाली येत नाही’ अशी कठोर भूमिका घेतली आहे. खासदारावर बंदी घातल्यामुळे सभागृहाच्या हक्कांचा भंग होतो त्यामुळे हा प्रश्न विशेषाधिकार समितीकडे पाठवावा, अशी विनंती शिवसेनेच्या सदस्यांनी मंगळवारी लोकसभाध्यक्षांकडे केली. मात्र दोन पानांच्या विशेषाधिकार प्रस्तावावर सरकार आणि शिवसेनेचे नेते यांच्यात तोडगा निघेल, म्हणून अध्यक्षांनी तो प्रलंबित ठेवला आहे. गायकवाड यांच्या वर्तनाने सगळ््या राजकीय वर्गाला खाली मान घालावी लागली असून कॅमेऱ्यांसमोर त्यांनी जो संताप व्यक्त केला त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा, असे भाजप नेतृत्वाने कळवले आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी म्हणाले की, विशेषाधिकाराचाभंग कोणाच्याही गैरवर्तनाने होत नाही. नक्वी यांनी सेनेच्या खासदाराचा उल्लेख केला नाही. परंतु सरकारला या प्रकरणात नेमके काय वाटते हे स्पष्ट झाले आहे. गायकवाड यांना विमान प्रवासाला परवानगी मिळावी, असे आवाहन शिवसेनेच्या प्रस्तावात आहे. परंतु सरकारच्या नेत्यांकडून शिवसेनेला अनौपचारिकरित्या असे सांगण्यात आले की खासदाराने खेद व्यक्त करावा किंवा त्यांना आणखी काही वेळ वाट बघावी. दिल्ली पोलिसांच्या विशेष चौकशी तुकडीकडून येणाऱ्या अहवालाची सरकारला प्रतीक्षा आहे. या तुकडीने १५ साक्षीदारांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही या प्रश्नावर निर्णय घेण्यास दिल्ली पोलिसांकडून या हंगामी अहवालाची माहिती दिली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)