शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विरोधात हक्कभंग आणणार - रवींद्र गायकवाड

By admin | Updated: March 26, 2017 21:44 IST

मी अज्ञातवासात वगैरे गेलेलो नाही. मंगळवारी गुढी पाडव्याच्या दिवशी मी उमरगा या मूळ गावी असेन. दुसऱ्या दिवशी मी लोकसभेच्या कामकाजाला उपस्थित असेन

ऑनलाइन लोकमतउमरगा, दि. 26 : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणानंतर आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे निघालेले उस्मानाबादचे खा. प्रा. रवींद्र गायकवाड हे मुंबईऐवजी वापी स्थानकावर उतरून उस्मानाबादकडे रवाना झाले. मात्र, ते अद्यापही जिल्ह्यात पोहोचले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांसह शिवसैनिकही त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. गायकवाड हे रविवारी उमरगा येथे येणार असल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. मात्र, दिल्लीहून रेल्वेने निघालेले गायकवाड यांनी प्रसारमाध्यमाचा सिसेमारा चुकवीत थेट मुंबई गाठली व सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन परत दिल्लीला रवाना झाल्याचे उमरगा येथील खासदारांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले. सोमवारी संसद अधिवेशनात एअर इंडियाच्या विरोधात सेनेच्या वतीने हक्कभंग प्रस्ताव आणण्यात येणार असल्याने ते उस्मानाबादला न येता परत दिल्लीला गेले असून, दिल्लीहून ते शुक्रवारपर्यंत येथे परत येतील, असेही कार्यालयाकडून सांगण्यात आले.

खा. रवींद्र गायकवाड यांना एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करीत शिवसैनिकांच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात उमरगा, लोहारा आदी ठिकाणी बंद ठेवून निषेध नोंदविण्यात येणार आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

एअर इंडियावर कायदेशीर कारवाई करणार - गायकवाडमी अज्ञातवासात वगैरे गेलेलो नाही. मंगळवारी गुढी पाडव्याच्या दिवशी मी उमरगा या मूळ गावी असेन. दुसऱ्या दिवशी मी लोकसभेच्या कामकाजाला उपस्थित असेन, अशी माहिती खा. रवींद्र गायकवाड यांनी ‘पीटीआय’ला फोनवरुन दिली. बुधवारपर्यंत या विषयी मिडीयाशी बोलण्यास टाळण्याचा सल्ला पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने दिला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने मला शिवीगाळ केली. मी कायदेशीर कारवाई करणार असून बुधवारनंतर याविषयी सर्वांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील घटनेनंतर मला मातोश्रीवरुन बोलावणे आले नव्हते. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आपण कुठे आहात, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली.