मुंबई : शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घातल्यामुळे ते बुधवारी चार्टर्ड विमानाने नवी दिल्लीत गेल्याचे सांगण्यात आले. ते शिवसेना खासदार राजकुमार धूत यांच्या विमानाने दिल्लीत गेल्याची शक्यता इंडिया टुडे वेबसाईटने वर्तविली आहे. गुरुवारी ते लोकसभेत आपली बाजू मांडणार असल्याचे कळते. गायकवाड यांच्यावरील बंदीचा मुद्दा लवकर न सुटल्यास संसदेत निदर्शने करू, असा इशारा शिवसेनेच्या लोकसभेतील सदस्यांनी दिला. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन सभागृहाच्या रक्षक आहेत. मात्र, आमचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही, असे सांगून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ म्हणाले की, सरकारचा घटक असल्यामुळे आम्ही सभागृहात गोंधळ करू इच्छित नाही; परंतु आम्हाला तसे करणे भाग पडेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रवींद्र गायकवाड चार्टर्ड विमानाने गेले दिल्लीत
By admin | Updated: April 6, 2017 05:49 IST