शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

विद्यापीठात राविकाँ-अभाविपची युती

By admin | Updated: October 21, 2014 00:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संयुक्त विजय प्राप्त करून विद्यापीठावर आपला झेंडा

विद्यार्थी संघ निवडणूक : फुलेकर अध्यक्ष व मट्टमवार सचिव नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संयुक्त विजय प्राप्त करून विद्यापीठावर आपला झेंडा फडकविला आहे. सोमवारी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष व सचिवपदाची निवडणूक पार पडली. यात अध्यक्षपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उमेदवार नीतेश फुलेकर विजयी झाला असून, सचिवपदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा बालाजी मट्टमवार याने बाजी मारली. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसांपर्यंत राविकाँ व अभाविप या दोन्ही विद्यार्थी संघटना निवडणुकीची वेगवेगळी तयारी करीत होते. परंतु सोमवारी ऐनवेळी या दोन्ही संघटनांनी हातमिळवणी करून युती केली. या दोन्ही संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या मते, तिसऱ्या संघटनेला रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. या दोन्ही संघटनांची युती झाली नसती तर त्याचा फायदा एनएसयूआय व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषदेला झाला असता. त्यामुळे रणनीतीचा एक भाग म्हणून या दोन्ही संघटनांनी ऐनवेळी हात मिळविला. यानंतर संख्याबळाच्या आधारे राविकाँला विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद देण्यात आले, तसेच अभाविपने सचिवपद स्वीकारले. युतीमुळे दोन्ही संघटनांना सहज विजय प्राप्त करता आला. विद्यापीठात नवे समीकरणनवनिर्वाचित सचिव बालाजी मट्टमवार याने विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्याला आपली प्राथमिकता राहणार असल्याचे यावेळी सांगितले. तो पुढे म्हणाला, यासाठी विद्यार्थ्यांचे नेटवर्क तयार केले जाईल. त्या माध्यमातून विद्यार्थी आपली समस्या विद्यार्थी संघापर्यंत पोहोचवू शकेल. लगेच त्या समस्येचे समाधान केले जाईल. (प्रतिनिधी)