शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवर्ल्डचा शार्प शूटर रवी सावंतचा संशयास्पद मृत्यू; सर्वत्र खळबळ

By admin | Updated: July 2, 2016 01:38 IST

मुंबई अंडरवर्ल्डचा शार्प शूटर रवी उर्फ रवींद्र शांताराम सावंत (वय ४४) याचा गुरुवारी मध्यरात्री नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 2-  मुंबई अंडरवर्ल्डचा शार्प शूटर रवी उर्फ रवींद्र शांताराम सावंत (वय ४४) याचा गुरुवारी मध्यरात्री नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांनंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, रवीचे नातेवाईक नागपुरात आल्यानंतरच त्याचे शवविच्छेदन केले जाणार असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे.जोगेश्वरीत राहणा-या रवी सावंतचा मुंबई अंडरवर्ल्डमध्ये १९९० ते ९४ पर्यंत प्रचंड दरारा होता. त्याच्या नावाने मुंबईतील व्यापारी, उद्योजकच नव्हे तर खतरनाक गुन्हेगारांनाही थरकाप सुटत होता. खंडणी वसुली, अपहरण आणि अनेक हत्या प्रकरणात नाव घेतल्या जाणा-या रवीविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३१/९४ नुसार १९९४ मध्ये टाडा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ३ / २ टाटा कायद्यानुसार मुंबई सत्र न्यायालयाने ७ सप्टेंबर १९९६ ला रवीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यावेळी मुंबईतील कारागृहातही अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू होता. रवीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत त्याला १९ सप्टेंबर १९९६ ला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून रवी येथेच शिक्षा भोगत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, १ जुलैच्या रात्री ७ वाजता त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. रवीच्या मृत्युप्रकरणी मेडिकल, कारागृह तसेच पोलीस प्रशासनाने कमालीची गोपनियता बाळगली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (१ वाजता)  या प्रकरणी धंतोली ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लोकमतला हे माहित पडताच रवीच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, पोलीस अथवा मेडिकल प्रशासनाकडून विस्तृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. नातेवाईक आल्यानंतरच शवविच्छेदन

रवीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अहवाल ध्यानात घेता त्याचे शवविच्छेदन करण्याचे तूर्त टाळण्यात आले. त्याचे नातेवाईक मुंबईतून आल्यानंतरच शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांनी लोकमतला सांगितले. त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली असून, शनिवारी दुपारपर्यंत ते नागपुरात येतील, अशी अपेक्षाही ठाणेदार माने यांनी व्यक्त केली.