शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रौफची आर्थर रोड कारागृहात रवानगी

By admin | Updated: November 12, 2016 03:55 IST

संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला व त्यानंतर फरारी झालेला अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याला शुक्रवारी विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

मुंबई : संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला व त्यानंतर फरारी झालेला अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याला शुक्रवारी विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने मर्चंटची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्याचा आदेश पोलिसांना दिला.दहा वर्षे शिक्षा भोगल्यावर मर्चंटने पॅरोलसाठी अर्ज केला. त्याचा अर्ज मान्य करण्यात आला. या संधीचा फायदा घेत मर्चंट फरारी झाला. त्याने थेट बांगलादेश गाठले. भारत-बांगलादेशाची हद्द बेकायदेशीरपणे पार केल्याने त्याला तेथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचने त्याचा ताबा मागितला. मुंबईत आल्यानंतर त्याला गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता उच्च न्यायालयात हजर करण्यात आले. कारण २०१०मध्ये उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना मर्चंटला शोधून काढून न्यायालयापुढे हजर करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी मर्चंटला सत्र न्यायालयात हजर करण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यानुसार शुक्रवारी मर्चंटला विशेष न्यायालयाचे न्या. आर. एम. जोशी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्या. मोरे यांनी मर्चंटची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्याचा आदेश पोलिसांना दिला. (प्रतिनिधी)