शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

रत्नागिरी जिल्हा परिषदच नंबर वन!

By admin | Updated: June 3, 2015 23:40 IST

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३२२१ कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्याप्रमाणे

रत्नागिरी : कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले असून, रत्नागिरी जिल्हा परिषदेने या कामामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ रत्नागिरी व अकोला या दोन जिल्हा परिषदांनी राज्यात सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण केले आहे.जानेवारी, २०१५मध्ये शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण करण्याचे सक्तीचे केले होते. मात्र, फेबु्रवारी व मार्च या महिन्यामध्ये वर्षअखेरच्या कामाची घाई असल्याने सेवा प्रणालीचे काम संथ गतीने करण्यात आले होते. शासनाने या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तरीही काम पूर्ण झालेले नव्हते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रेरणा देशभ्रतार रुजू झाल्या. त्यानंतर देशभ्रतार यांनी सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये, अशी सक्त सूचना त्यांनी वित्त विभागाला दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३२२१ कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्याप्रमाणे शासनाने रत्नागिरी व अकोला या दोन जिल्हा परिषदा या प्रणालीमध्ये राज्यात प्रथम असल्याचे जाहीर केले.मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी सेवार्थ प्रणालीबाबत कडक भूमिका घेतल्याने जिल्हा परिषदेला प्रथम क्रमाकाचा मान मिळाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)सेवार्थ प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कमी-जास्त प्रमाण होणार नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पध्दतीने वेळेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डाटा या प्रणालीमध्ये फीट झाल्यानंतर वेतन वेळेत होणार आहे. नसेवार्थ प्रणाली अपूर्ण राहिल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्याशिवाय आपले वेतन जमा करु नये, अशी सूचना वित्त विभागाला दिली होती. त्याप्रमाणे देशभ्रतार यांनी स्वत:चे वेतन घेतलेले नाही.