शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राठोड दाम्पत्याने केली एव्हरेस्ट चढाई

By admin | Updated: June 9, 2016 04:42 IST

जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची अभिमानास्पद कामगिरी शहर पोलिस दलातील दाम्पत्याने केली आहे.

पुणे : जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची अभिमानास्पद कामगिरी शहर पोलिस दलातील दाम्पत्याने केली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात तारकेश्वरी भालेराव -राठोड (३०) व दिनेश टी. राठोड (३०) हे कार्यरत आहेत. ते २००६ साली शहर पोलिस दलात रूजु झाले. तारकेश्वरी या राष्ट्रीय फुटबॉलपटू असून, आंतरराष्ट्रीय कराटेपटू देखील आहे. तर दिनेश हे आंतरराष्ट्रीय कराटे व किकबॉक्सिंगपटू आहेत. या दोघांचा २००८ साली प्रेमविवाह झाला. आपल्या एव्हरेस्टच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. शिखर सर केल्याने स्वप्नपूर्ती झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या दाम्पत्याचा हा दुसरा प्रयत्न असून, गेल्या वर्षी एव्हरेस्टवर झालेल्या हिमस्खलनामुळे त्यांना आपला प्रयत्न अर्ध्यावर सोडून द्यावा लागला होता. या वर्षी देखील या दाम्पत्याने पोलीसखात्यातून परवानगी घेऊन ध्येयपूर्तीसाठी एव्हरेस्टवर चढाईचा निर्णय घेतला. हे दाम्पत्य ३० एप्रिलला बेसकॅम्पजवळ पोहचले. तब्बल २३ दिवस दिवस चाललेल्या या मोहिमेची २३ मे रोजी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी यशस्वी सांगता झाली. या विषयी लोकमतला माहिती देताना दिनेश म्हणाले, अखेरच्या टप्प्यात २१ मे रोजी वातावरण अचानक खराब झाले. सायंकाळी सात नंतर रात्री एक ते दोन पर्यंत जोरदार वारे वाहत होते. बर्फवृष्टी देखील झाली. मात्र बर्फाच्या टणक गोळ््यांचा मारा व्हावा, अशी ही बर्फवृष्टी होती. हवामान विभागाने २३ तारखेनंतर वातावरण आणखी खराब होण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्याआधीच पोहचणे गरजेचे होते. त्यामुळे २२ मे रोजी सकाळी सहा वाजता कॅम्प३ पासून सुरूवात केली. साधारण सकाळी साडेअकरा वाजता कॅम्प फोर पर्यंत पोहोचलो. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत विश्रांती केली. या नंतर अखेरच्या टप्प्याची चढाई पूर्ण करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले.>गिर्यारोहकांचा धक्कादायक मृत्यू बेस कॅम्पवर असताना कोलकाता पोलिस दलातील गोतम घोष हा गिर्यारोहक आपणहून भेटीला आला होता. गिर्यारोहण करताना काय काळजी घ्यायची याचे त्याने आम्हाला मार्गदर्शन केले. मात्र २१ मेच्या रात्री घोष यांच्यासह त्यांच्या दोघा पुरूष गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याचे कळले. तसेच त्यांच्या बरोबरील सरीता हाजरा या महिला गिर्यारोहकाला हिमदंश झाल्याने हाताची बोटे गमवावी लागली. तसेच दोन्ही पायांना देखील गंभीर दुखापत झाल्याचे समजले. ज्या व्यक्तीने बेसकॅम्पवर असताना आम्हाला स्वत:हून मार्गदर्शन केले, त्याचा व्यक्ती झालेला मृत्यू धक्कादायक होता.