शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंना फसविण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - अबू आझमी

By admin | Updated: June 1, 2016 19:19 IST

सध्या कोणाचाही कोणाला फोन येवू शकतो़ त्यामुळे लगेचच त्या व्यक्तीला दोषी समजणे चुक आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले हे समोर येवू द्या, त्यानंतरच काय ते ठरविता येईल़.

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 1 -  सध्या कोणाचाही कोणाला फोन येऊ शकतो़ त्यामुळे लगेचच त्या व्यक्तीला दोषी समजणे चुक आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले हे समोर येवू द्या,  त्यानंतरच काय ते ठरविता येईल़. परंतु विनाकारण आकांडतांडव केले जात असून यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करीत खडसे हे चांगले व्यक्ती असल्याची पाठराखणही सपाचे आमदार अबू आझमी यांनी केली़. कंधार येथील एका कार्यक्रमासाठी ते बुधवारी नांदेडात आले होते़ ते म्हणाले, मी भाजपाच्या विरोधात आहे. परंतु खडसेंचे जळगांवमध्ये चांगले काम आहे. अल्पसंख्याक समाजातील लोकही त्यांना मानतात. त्यामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नजरेत आले आहेत. आजघडीला त्यांच्या पाठीशी भाजपाचा कुणीही उभा राहत नसून खडसेंनीही राजीनामा देण्याची गरज नसल्याचे आझमी म्हणाले. या देशात मुस्लिमांना काहीच द्यायचे नाही हाच भाजपाचा अजेंडा आहे. त्यामुळे भाजपाच्या काळात आम्हाला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. देशात शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था महाराष्ट्रात असून भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्येत वाढच झाली आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात कोणतेच काम योग्यरितीने झाले नाही़. विदेश नितीही चुकीची असून चीन चिथावणीखोर वक्तव्य करीत आहे, तर मोदी पाकिस्तानात जाऊन शरीफ यांची भेट घेत आहेत. सरकार आपल्या भूमिकांवरही ठाम नसून महाराष्ट्रात गोमांस बंदी केली असताना शेजारील त्यांचीच सत्ता असलेल्या गोव्यात मात्र गोमांसावर बंदी नाही़, अशी दुटप्पी भूमिका या सरकारची आहे. मुस्लिमांसाठी असलेल्या बजेटमध्येही वाढ करण्याची गरज असून आरक्षणाच्या मुद्यावर आता काँग्रेस ओरडत असली तरी, त्यांच्या सत्ता काळात त्यांनी अखेरच्या क्षणी केवळ अध्यादेश काढण्यापेक्षा दुसरे काही केले नाही़.