शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती

By admin | Updated: March 31, 2016 12:54 IST

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३१ - राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शुक्ला यांच्या नावाचीच चर्चा सुरू होती, अखेर आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून शुक्ला यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश आज गृह विभागाने काढले आहेत. सध्याचे पोलिस आयुक्त तथा पोलिस महासंचालक के.के. पाठक हे आजच (३१ मार्च) निवृत्त होत आहेत. 
रश्मी शुक्ला या सन १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त तसेच आयुक्तपद भूषविले आहे. मुंबई पोलिस दलातही त्यांनी वेगवेगळया पदांवर कर्तव्य बजावले असून एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे. 
पुण्याच्या पोलिस आयुक्त होण्याचा मान मिळवणार्‍या रश्मी शुक्ला या दुसर्‍या महिला पोलिस अधिकारी आहेत. यापूर्वी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तपद भूषवले. गेल्या दोन महिन्यात पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याबाबत तर्क-वितर्क काढले जात होते. शुक्ला यांची नियुक्ती निश्‍चित मानली जात होती. मात्र, इतर अधिकार्‍यांची नावे देखील चर्चेत होती. अखेर शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे अनेक चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. आयुक्त रश्मी शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.