शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

वन विभागाच्या पुस्तिकेत ‘राशीचक्र’!

By admin | Updated: August 28, 2015 01:03 IST

वेगवेगळ््या वृक्षांची जोपासना व्हावी व वनीकरणात वाढ व्हावी याकरिता वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुुस्तिकेत राशी चिन्हे आणि नवग्रहांनुसार तसेच रामायण-महाभारतामधील झाडे

मुंबई : वेगवेगळ््या वृक्षांची जोपासना व्हावी व वनीकरणात वाढ व्हावी याकरिता वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुुस्तिकेत राशी चिन्हे आणि नवग्रहांनुसार तसेच रामायण-महाभारतामधील झाडे आणि वेगवेगळ््या धर्मांशी संलग्न झाडे यांचा समावेश करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.सामाजिक वनीकरण व वन विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या या पुस्तिकेत भारतीय संस्कृतीत वनांना देवतांच्या रुपात बघितले जाते, असे नमूद केले आहे. विवाहित स्त्रीया अशोक, मोहा, आंबा यांची पती मानून पुजा करतात तर पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वट पौर्णिमेला वडाची पूजा करतात. मानवाला आपला धर्म व रितीरिवाज अत्यंत प्रिय असतात. आताच्या विज्ञान युगात सुद्धा त्याची प्रचिती येते, असे नमूद केले आहे.राशी चिन्हानुसार झाडे यांची जंत्री देताना मेष, वृषभ, मिथून, कर्क वगैरे राशीकरिता असलेल्या आवळा, तांदूळ, सूर्यफूल, गुग्गुळ, पळस, मूग वगैरे वृक्षांचा यामध्ये समावेश केलेला आहे. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु आदी नवग्रहांकरिता असलेल्या झाडांचीही यादी प्रसिद्ध केलेली आहे. रामायणात उल्लेख झालेल्या १९ वृक्षांची तर महाभारतात उल्लेख झालेल्या ३३ वृक्षांची यादी पुस्तिकेत नमूद केलेली आहे. इस्लाम, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, पारशी धर्माशी संलग्नझाडांची यादी दिलेली असून रामायणातील ज्या अशोक वनात रावणाने सीतेला नेऊन ठेवले होते तेथील ३७ वृक्षांची जंत्री दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)