शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ कलासंग्रहाला ‘संरक्षण कवच’

By admin | Updated: November 3, 2016 02:03 IST

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने कलासंग्रहाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नवा प्रकल्प हाती घेतला आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने कलासंग्रहाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नवा प्रकल्प हाती घेतला आहे. या वस्तुसंग्रहालयाने ‘कन्झर्व्हिंग द कलेक्शन : द केअरिंग पाथ आॅफ 5000 इयर्स आॅफ अवर आर्ट’ प्रकल्पांतर्गत ५० अतिशय दुर्मिळ आणि दर्जेदार कलाकृतींचे संवर्धन केले आहे. देशभरात अशा प्रकारे आपल्या संग्रहातील अतिशय दुर्मिळ कलाकृतींचे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविणारे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय पहिलेच ठरले आहे.पाच हजार वर्षांपूर्वीपासून असणाऱ्या दुर्मिळ कलाकृतींचे संवर्धन करण्याचा पहिला टप्पा नुकताच संग्रहालयाने पूर्ण केला आहे. त्यात दस्ताऐवज, मिनिएचर पेंटींग, कपड्यावरचे काम, धातूचे शिल्प, मातीचे शिल्प, हस्तिदंताच्या कलाकृती अशा वेगवेगळ््या शैलीतील कलाकृतींचा समावेश आहे. हा प्रकल्प १० टप्प्यांत विभागला असून पहिला टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे.या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात लेझर तंत्रज्ञानाद्वारे १५०० वर्षांपूर्वीचे धातू आणि दगडाचे संवर्धित करण्यात आलेले शिल्प मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे. तसेच, या दुर्मिळ संग्रहात राजा रवी वर्मा यांनी साकारलेले चित्र, पेस्तोनजी बोमानजी आणि वासुदेव गायतोंडे यांचे चित्र, कापडावरील दख्खनी चित्र यांचा समावेश आहे. हा दुर्मिळ खजिना काही टप्प्यांनी कलारसिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे मुख्य क्युरेटर अनुपम शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.