शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रॅपलिंग अन् बोटिंग बेततेय मुलांच्या जिवावर

By admin | Updated: May 14, 2017 02:22 IST

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हांळी सुटीमध्ये शाळेतील इतर १२० मुलांबराबर सजन येथील नेचर टॅल्स येथे आला होता

राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : मुंबई येथे राहणारा १३ वर्षीय बालक मनन केकीन गोगरी हा तरुण मित्र मंडळ मुंबईच्या टीमसोबत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हांळी सुटीमध्ये शाळेतील इतर १२० मुलांबराबर सजन येथील नेचर टॅल्स येथे आला होता. दुसऱ्या दिवशी यातील ६० मुलांना घेऊन नेचल टॅल्सची अ‍ॅक्टीव्हीटी टिम चिंचपाडा डॅम (मोह लघु पाटबंधारे) येथे पोहण्या करीता घेऊन आले होते. मात्र, येथील खोल पाणी व मुलांना पोहता येत नव्हते या पार्श्वभूमीवर मनन याने लाईफ जॅकेट मालेली उडी त्याच्या जिवावर बेतली. येथील मोहखुर्द बंधाऱ्यामध्ये घडली असल्याने या पाट बंधऱ्याचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. उन्हाळ्याची सुट्टी लागली की, मुंबई, ठाणे या भागतून मुलांना घेऊन अ‍ॅक्टीव्हिटी टिम या लघु पाटबंधाऱ्यावर रॅप्लिंग आणि बोटिंगसाठी शासनाची परवानगी न घेता येत असतात. त्यात हा बंधारा दोन टेकड्यांचा मध्ये असल्याने खूप खोल, उंच सखल असल्याने स्थानिक लोक ही या भागात पोहायला जात नाही. मात्र, काही अ‍ॅक्टीव्हिटी टिम कुठली ही सुरक्षा किंवा माहितगाराना सोबत न घेता रॅप्लिंग आणि बोटिंग करत असल्याचे येथील स्थानिकाचे म्हणे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पालक सुद्धा या अ‍ॅक्टिव्हिटी क्लब कडे कोणतीही चौकशी करीत नाही. त्यांच्या कार्यालयाचा कॉर्पोरेट लूक पाहून आपल्या मुलांना त्यांच्या ताब्यात देण्याच्या प्रकारातून अपघात वाढले आहेत.या बंधाऱ्यात मुबलक पाणी व निसर्गसंपदा लाभलेली असल्याने या ठिकाणी काही खाजगी व्यावसायिकांनी बोटिंग व बंधाऱ्याच्या भिंतीला ट्रेकिंग करण्याचे व्यवसाय सुरु केले आहेत. खरंतर या व्यावसायिकांना कुणी परवानगीदिली व त्यांच्याकडून काही उत्पन्न मिळते का? असा प्रश्न उपस्थित होत असून या ठिकाणी वनविभागाने जर ही व्यवस्था उपलब्ध करून दिली तर त्याचा शासनाला नक्कीच फायदा होईल असा ही एक मत प्रवाह आहे.>नॅचरल ट्रॉल्सला या पूर्वी २०१२ या वर्षी बोटिंगसाठी नियम व शर्तीच्या आधिन राहून परवानगी दिली होती. तसा करार सुद्धा करण्यात आला होता. त्यावेळी याचा जबाबदारी रवी गावकवाड या अभियंत्यावर होती. जानेवारीपासून या प्रकल्पाची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी कराराची प्रत मागविली आहे. तसेच सुरक्षे संदर्भात काय उपाय योजना केल्या होत्या याचा लेखी खुलासा सुद्धा मागविला आहे. - एन. एस. दुसाणे, कार्यकारी अभियंता, (पाटबंधारे विभाग, मनोर)