शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हॉटेल उद्योगात तेजी

By admin | Updated: June 13, 2016 06:03 IST

भारतीय अर्थव्यवस्थेत येत असलेल्या सुधाराचे पडसाद भारतीय हॉटेल उद्योगातही सकारात्मकरीत्या उमटताना दिसत असून

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत येत असलेल्या सुधाराचे पडसाद भारतीय हॉटेल उद्योगातही सकारात्मकरीत्या उमटताना दिसत असून, देशातील विविध श्रेणींच्या हॉटेलमधील व्यवसायात गेल्या दोन वर्षांत २२ टक्क्यांची सातत्यपूर्ण वाढ नोंदली गेली. विशेष म्हणजे पडवणाऱ्या दरांसोबत पंचतारांकित हॉटेल्समधील बुकिंगलाही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.हॉटेल उद्योगाशी संबंधित सर्वेक्षण संस्थेने या उद्योगातील आगामी वर्षाच्या कारकिर्दीबाबत केलेल्या अहवालातून रंजक माहिती पुढे आली आहे. पर्यटन उद्योगाचे मूलभूत घटक मानल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या सेवा देणाऱ्या कंपन्या आणि हॉटेल्स कंपन्या यांच्या व्यवसायातही वाढ होताना दिसत आहे. भारतात थ्री स्टार आणि त्यावरील हॉटेलांची संख्या १,२०० पेक्षा जास्त असून, तारांकित खोल्यांची संख्या आता साडेसात हजारांच्या वर गेली आहे. पंचतारांकित हॉटेलच्या सेवेत असलेल्या कंपन्यांतर्फे आगामी पाच वर्षांत देशभरात सुमारे ३५० नव्या हॉटेलची निर्मिती होणार असून, या माध्यमातून आणखी किमान दोन हजार तारांकित खोल्या उपलब्ध होतील. गेल्या पाच वर्षांपासून भारतीय हॉटेल कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला असून, बहुतांश कंपन्यांनी ई-कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या सेवा सुरू केल्या आहेत. आतापर्यंत लोक शाळांच्या सुट्यांच्या काळात पर्यटनासाठी बाहेर पडत असत. त्यामुळे विशिष्ट कालावधीत पर्यटन हंगाम असे. परंतु विमान आणि हॉटेल अशा दोन्ही क्षेत्रांतील कंपन्यांनी सरत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतर व्यवसायाला गती देण्यासाठी या कंपन्यांनी सुटीच्या कालावधीसोबत वर्षभर सतत नवनव्या आॅफर्स ग्राहकांना देऊ केल्या आहेत. पर्यटनाच्या ई-कॉमर्स सेवापर्यटन क्षेत्रातही ई-कॉमर्स कंपन्यांनी प्रवेश केला आहे. रेल्वे, विमान, बससेवांचे आगाऊ बुकिंग करण्याच्या सुुविधेसोबतच ग्राहकांना हॉटेलचे देखील बुकिंग करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांना स्वत:च्या प्रवासाचे पूर्ण नियोजन करणे देखील शक्य होते. >पर्यटनाचा पॅटर्नच पूर्णपणे बदलला सुटीच्या किंवा पर्यटनाचा हंगाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालावधीऐवजीही ग्राहकांना विमान आणि हॉटेल कंपन्यांनी घसघशीत सूट योजना घोषित केल्यामुळे ग्राहकांनीही या ‘आॅफ सीझन’ योजनांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, पर्यटनाचा पॅटर्नच पूर्णपणे बदलला आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता विमान आणि हॉटेल कंपन्यांनी एकमेकांशी करारबद्ध होण्याच्या प्रकारांतही झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती या उद्योगाचे अभ्यासक सॅम्युअल परेरा यांनी दिली. पंचतारांकित हॉटेल सेवाही अडीच हजारांत : पर्यटनाचा हंगाम वगळता अनेक पंचतारांकित हॉटेल कंपन्या आपल्या व्यवसायवृद्धीसाठी विविध आॅफर्सचा मारा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नामांकित हॉटेल्समधून आॅफ सीझनध्ये हॉटेलच्या खोल्याचे दर अडीच हजारांपर्यंत खाली येताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना विमान प्रवासाप्रमाणेच तारांकित हॉटेल्समध्ये राहण्याची इच्छाही पूर्ण करण्याची संधी मिळत आहे.