मुंबई : बलात्कार आणि विनयभंगानंतरही तक्रारदार मॉडेलने उपमहानिरीक्षक सुनील पासरकर यांच्यासोबतच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या. त्यांना महागडी गिफ्ट्स दिली, त्यांनी दिलेली गिफ्ट्स स्वीकारली. त्यांची बदली रोखण्यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती या मॉडेलनेच जबाबातून पोलिसांना दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल आणि पारसकर एप्रिल 2क्13पासून ओळखत होते. एप्रिलमध्ये मॉडेलने आपल्या भावाविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. भावाने आपल्या आईला मारहाण केल्याचा आरोप या मॉडेलने केला होता. मात्र दिंडोशी पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे दाद मागण्यासाठी ती पारसकर यांच्याकडे गेली होती. यानंतर ऑक्टोबर 2क्13मध्ये याच मॉडेलने तिच्या सोसायटीत राहणा:या एका तरुणाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली होती. काही दिवसांनी पारसकर यांनी ‘तू या प्रकरणात एकटय़ाने काहीच करू शकणार नाहीस, माङयाशी संपर्क साध’, असे सूचित केल्याचा दावा या मॉडेलने केल्याचे समजते.
याच दरम्यान एका एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटवर (वेश्याव्यवसायासाठी हायप्रोफाइल तरुणी पुरविणारे अवैध रॅकेट) या मॉडेलचा फोटो प्रसिद्ध झाला होता. त्याचा त्रस झाल्यानंतर मॉडेलने थेट उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त असणा:या पारसकर यांची भेट घेतली. याप्रकरणी पारसकर यांनी तपासाचे आदेश दिले. 2 जानेवारी 2क्14 रोजी वेबसाइटवर मॉडेलचा फोटो प्रसिद्ध करणा:यांविरोधात गुन्हा नोंदविला. तसेच या गुन्ह्यातील सर्वाना गजाआड केले.
मॉडेलच्या दाव्यानुसार, त्याआधी नोव्हेंबर-डिसेंबर 2क्13मध्ये पारसकर यांनी मला एक फ्लॅट दाखविण्याच्या निमित्ताने ठाण्यातील एका इमारतीत नेले. फ्लॅटमध्ये गेल्यावर पारसकर यांनी माङयाशी लगट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास मी विरोध केल्यानंतर त्यांनी माफी मागितली. आठवडय़ानंतर एका रिअल इस्टेट एजंटची भेट घालून देण्याच्या निमित्ताने पारसकर यांनी या मॉडेलला मढ बेटावरील बंगल्यात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. पारसकर यांच्या जबरदस्तीने ती जखमी झाली, असा दावा मॉडेल आपल्या जबाबात करते. ही घटना घडल्यानंतर पारसकर यांनी या मॉडेलला आय-फोन भेट म्हणून दिला. तसेच एस्कॉर्ट एजन्सीच्या प्रकरणात मदत केल्याबद्दल ‘तूही मला काही तरी द्यावेस’, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा मॉडेलने पारसकर यांना महागडय़ा घडय़ाळांचे (लॉन्जिनीज) फोटो पाठवले. त्यापैकी एक पारसकर यांनी पसंत केले. ते 7क् हजारांचे घडय़ाळ मॉडेलने त्यांना भेट म्हणून दिले.
पारसकर यांची अपर आयुक्त पदावरून राज्य पोलीस मुख्यालयात बदली झाली. तेव्हा मॉडेलने पारसकर यांना 57 हजार रुपयांचे पाकीट (वॉलेट), पेन आणि पफ्यरुम गिफ्ट केले. तेव्हा बदली रोखण्यासाठी काही प्रयत्न करू शकतेस का, अशी विचारणा पारसकर यांनी केली होती. तेव्हा मॉडेलने तिच्या पीआर व्यवस्थापकाशी त्यांची भेट घालून दिली. त्यावेळी पारसकर यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. पारसकर यांनी केलेल्या अत्याचाराची माहिती त्यांच्या पत्नीला त्याचवेळी द्यायची होती; मात्र पारसकर यांनी पत्नीला जराही एकांत न दिल्याने मला संधी मिळाली नाही, असाही दावा या मॉडेलने केल्याचे समजते. (प्रतिनिधी)
वॉचमनने ओळखले?
पारसकर यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या क्राइम अगेन्स्ट वूमन सेलकडून सुरू आहे. आज या पथकाने मढ आयलँडवरील बंगल्याचा पंचनामा केला. तसेच बंगल्याचा मालक आणि वॉचमनचे जबाब नोंदविले. या वेळी मॉडेल पोलीस पथकासोबतच होती. तिला प्रत्यक्ष आणि पारसकर यांचा फोटो पाहून वॉचमनने दोघांची ओळख पटवली. हे दोघे काही महिन्यांपूर्वी बंगल्यात आले होते आणि एक तास थांबले होते, असे वॉचमनने सांगितले.
दारूच्या नशेत बलात्कार
पारसकर यांनी आपल्यावर दारूच्या नशेत बलात्कार केल्याचा आरोप मॉडेलने जबाबात केला आहे.
मॉडेलचा जबाब
गुन्हे शाखेने मॉडेलचा कबुली जबाब दंडाधिका:यांसमोर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दंडाधिका:यांकडे पत्रव्यवहार केला.