शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

विक्रोळीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: January 15, 2015 05:19 IST

विक्रोळीत एका १७ वर्षीय मुलीवर शेजारी राहणारा तरुण गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार करीत असल्याची धक्कादायक घटना समोर आली.

मुंबई: विक्रोळीत एका १७ वर्षीय मुलीवर शेजारी राहणारा तरुण गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार करीत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी संजीव मुनीव चव्हाण (३१) या नराधमास बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करून १ फेब्रुवारीपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.विक्रोळी पूर्वेकडील वाल्मिकीनगर परिसरात १७ वर्षीय तक्रारदार मुलगी कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ही मुलगी घरीच राहत होती. त्याच परिसरात राहणाऱ्या चव्हाणने हीच संधी साधून घरात कुणीही नसताना लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. मात्र भावाच्या जिवासाठी गेल्या तीन वर्षांपासून ही मुलगी अत्याचार निमूटपणे सहन करीत राहिली. मंगळवारी रात्री शौचालयासाठी बाहेर पडलेल्या या मुलीला चव्हाणने वाटेत गाठले आणि शौचालयाच्या मागच्या बाजूस नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथून गेलेल्या एका मुलाची नजर नराधमाच्या कृत्याकडे गेली. त्याने तत्काळ मुलीच्या आईला याबाबत माहिती दिली. आईनेही मुलीकडे धाव घेईपर्यंत मुलगी घराच्या वाटेने येताना दिसली. याप्रकरणी तिच्याकडे विचारणा केली असता, मुलीने नराधमाचे पितळ उघडे केले. स्थानिकांच्या मदतीने चव्हाणला बेदम पोलिसांच्या हाती सोपविण्यात आले. विक्रोळी पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याखाली चव्हाणला अटक केली. आज त्याला १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चव्हाण हा बेरोजगार आहे. त्याचे लग्न झाले असून, त्याला ३ मुले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)