शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या शोधात आलेल्या तरुणीवर बलात्कार

By admin | Updated: March 18, 2017 05:49 IST

नोकरी शोधण्यास मदत करण्याच्या बहाण्याने मित्रानेच २७ वर्षांच्या तरुणीवर मित्राच्या मदतीने बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने पाच मजली इमारतीवरून उडी

मुंबई : नोकरी शोधण्यास मदत करण्याच्या बहाण्याने मित्रानेच २७ वर्षांच्या तरुणीवर मित्राच्या मदतीने बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने पाच मजली इमारतीवरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना पायधुनी परिसरात शुक्रवारी घडली. या प्रकरणी संतोष रामसागर कनोजिया (२६), फारुक अब्दुल लतीफ खान (३१) यांना अटक झाली आहे.उत्तर प्रदेश येथील ही २७ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. याचवेळी गावाकडील मित्र संतोष कनोजिया याने तिला मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. गेल्या आठवड्यात ती कनोजियासोबत मुंबईत आली. मुंबईत स्वत:चे घर मिळेपर्यंत कनोजियाने तिला स्वत:च्या घरी राहण्यास सांगितले.गुरुवारी रात्री संतोष या तरुणीला फारुक राहत असलेल्या गोदामामध्ये जेवणासाठी घेऊन आला. पायधुणी येथील झकेरिया रस्त्यावरील ‘सुरंगी मेन्शन’ या इमारतीच्या गच्चीवरील गोदामामध्ये फारुक राहतो. फारुकशी आपली ओळख असून, तो नोकरी मिळवून देण्यास मदत करेल, असे तिला सांगितल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत येण्यास होकार दिला होता. जेवणानंतर रात्र झाली असल्याने फारुकने त्यांना थांबण्याचा सल्ला दिल्यामुळे ते तेथेच थांबले.पहाटे तीनच्या सुमारास या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. अखेर त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने पहाटे चारच्या सुमारास गच्चीवरून खाली उडी मारली. ती खाली पडल्याच्या आवाजाने आसपासचे लोक जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलीस तेथे दाखल झाले. तरुणीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबाबावरून सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात संतोष व फारुक या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)सुटकेसाठी गच्चीवरून मारली उडीशुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास संतोष आणि फारुकने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तिने त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही तिच्यावर अत्याचार करत राहिले. अखेर त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने पहाटे चारच्या सुमारास गच्चीवरून खाली उडी मारली.