शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलिसाच्या भाचीवर बलात्कार

By admin | Updated: July 20, 2016 20:38 IST

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर मुंबई येथे नेऊन बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी मंगळवेढा येथील एका युवकासह व अन्य एकाविरुद्ध

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि.20 -  लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर मुंबई येथे नेऊन बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी मंगळवेढा येथील एका युवकासह व अन्य एकाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित मुलीने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी किरण किशन चव्हाण (वय १९,रा. शिक्षक कॉलनीसमोर)व त्याचा मित्र अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी ही एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या मामाच्या घरी (सोलापूर) आली होती. याचदरम्यान पीडित मुलीची व किरण या दोघांची ओळख झाली. पीडित मुलीला सातत्याने लग्नाचे आमिष दाखवून आरोपी हा नेहमीच फोनवर बोलायचा. मागील दोन महिन्यांखाली पीडित मुलीला औरंगाबाद येथील एका मुलाने लग्नासाठी पसंत केले होते, या दोघांचा साखरपुडाही झाला होता. याबाबतची माहिती पीडित मुलीने आरोपीस सांगितली होती. तरीही आरोपी किरण याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तू माझ्यासोबत चल, नाही आलीतर मी तुला पळवून घेऊन जाईन असे म्हणत होता.आरोपीने पीडित मुलीस मोबाईलवर एसएमएस पाठवून तू कविता नगर पोलीस लाईनच्या गेटवर ये नाहीतर तुझ्या मामाच्या घरी घुसून तुला ओढून नेईन असे म्हटले.यावेळी पीडित मुलीने घाबरुन त्याला समजून सांगण्यासाठी कविता नगर पोलीस लाईन गेटवर गेली. यावेळी किरण चव्हाण हा अन्य दोन मित्रांसोबत एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून मंगळवेढा येथे घेऊन गेला. यावेळी सदर गाडी तेथेच सोडून पीडित मुलीला खासगी बसमध्ये बसवून पुण्याला घेऊन गेला. पुण्यात कोणीच ओळखीचे नसल्याने आरोपीने मुंबईतील बहिणीच्या घरी नेऊन पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.चार वर्षांपूर्वी आईचे निधन पीडित मुलीच्या आईचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. वडील सांभाळ करत नसल्याने पीडित मुलगी ही मावशीकडे सोलापुरात राहत असे. तिचे मामा ग्रामीण पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत.

शासकीय रुग्णालयात उपचारपीडित मुलीवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक काझी, पोलीस निरीक्षक जिरगे, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, सहायक पोलीस निरीक्षक आयलाने यांनी भेट देऊन पीडित मुलीची विचारपूस केली.

आरोपीस अटकपीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी आरोपी किरण किशन चव्हाण यास सोलापुरातून अटक केली आहे. आरोपीचे वडील हे कृषी खात्यात नोकरीला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राठोड यांनी सांगितले.