शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद मुलीचे अपहरण करून बलात्कार

By admin | Updated: November 4, 2016 05:21 IST

१७ वर्षाच्या अल्पवयीन गतिमंद मुलीचे अपहरण करुन बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मालाड येथील मार्वे परिसरात घडली

मुंबई : जोगेश्वरी येथे सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच एका १७ वर्षाच्या अल्पवयीन गतिमंद मुलीचे अपहरण करुन बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मालाड येथील मार्वे परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिच्या दोघा मावस भावांसह पाच जणांना दिंडोशी पोलिसांनी अटक असून हे सर्वजण एकाच परिसरातील आहेत. या नराधमांनी सात दिवस अत्याचार करून या मुलीला मार्वे बीचवर सोडून दिले होते, पीडित तरुणी ११ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय चाचणीतून उघड झाले असून या पूर्वीही तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे दिंडोशी पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपींमध्ये एक अल्पवयीन मुलगा असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मालाड पूर्वेला चिंचोली फाटक परिसरात आईसोबत ही मुलगी राहात होती. तिची आई धुणीभांड्याचे काम करत असल्याने मुलगी दिवसभर घरी एकटीच असायची. २१ आॅक्टोबर रोजी ती घरातून बेपत्ता झाली. परिसरात व नातेवाईकांकडे शोधूनही ती न सापडल्याने तिच्या आईने दिंडोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिला परिसरातील काही जण घेऊन गेल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. २८ आॅक्टोबरला ती मार्वे बीचवर आढळली. वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तसे ती ११ आठवड्यांची गर्भवती असल्याचेही उघड झाल्याने या पूर्वीही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने परिसरातील ५ जणांची नावे सांगितली. त्यामध्ये दोघेजण तिचे मावस भाऊ होते, तर एकजण रिक्षाचालक होता. ते पूर्वीपासून तिला मार्वे येथील रिसॉर्टमध्ये घेऊन जात असल्याचेही चौकशीत समोर आले. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता चौघांना ७ आॅक्टोबरपर्यत पोलीस कोठडी मिळाली तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले.>कॉटेज चालकावर कारवाईची मागणीमार्वे परिसरातील अनेक लॉज आणि कॉटेजमध्ये अश्लील चाळे चालत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे या मुलीला कॉटेजमध्ये आठ दिवस कोंडल्याची बाब उघड झाली नाही. मुख्य म्हणजे कॉटेज आणि लॉजमध्ये येणाऱ्यांचे ओळखपत्र तपासणे चालक आणि मालकांना बंधनकारक आहे, तरीदेखील त्याकडे ते दुर्लक्ष करतात. जर या मुलीबाबत वेळीच चौकशी केली असती, तर अत्याचारापासून ती बचावली असती. त्यामुळे संबंधित कॉटेज चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.