शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचे अपहरण करून बलात्कार

By admin | Updated: July 18, 2016 01:21 IST

महाविद्यालयात जात असताना गुंगीचे औषध देऊन १७ वर्षीय युवतीचे अपहरण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली

पुणे : महाविद्यालयात जात असताना गुंगीचे औषध देऊन १७ वर्षीय युवतीचे अपहरण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली आहे. पोलिसांनी दोघा जणांना बेड्या ठोकल्या असून मुलीवर उपचार करण्यात आले आहेत. चेतन सोमनाथ शिरोळे (रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर) मिलिंद शिवानंद बनसोडे (दोघेही वय २१, रा. रामटेकवाडी, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी एकाच भागात राहण्यास आहेत. तरुणी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास हडपसरमधील गाडीतळ रस्त्याने महाविद्यालयाकडे जात होती. त्या वेळी आरोपींनी तिच्या दुचाकीला पाठीमागून धडक मारली. त्यानंतर तिला पाणी देण्याचे नाटक करीत त्यामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर स्वत:च्या गाडीवर बसवून सासवड रस्त्यावर नेले. सासवड येथील एका खोलीमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला. पीडित मुलगी दुसऱ्या दिवशी घरी सकाळी घरी आल्यानंतर हा प्रकार तिने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित तरुणीचे कुटुंब वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहे. त्यांनी प्रथम वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, घटना गाडीतळ परिसरात घडली असल्याने हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)>अहमदनगरमधील कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुण्यात हडपसरमध्येही अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.