शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराविरोधात बलात्कारचा गुन्हा

By admin | Updated: October 19, 2016 21:36 IST

२००८ साली झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले . लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. आठ वर्षाच्या कालावधीत त्याने केवळ तिचे लैंगिक

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 19 - २००८ साली झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले . लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. आठ वर्षाच्या कालावधीत त्याने केवळ तिचे लैंगिक शोषणच केले नाही तर तिच्याकडील रोख २ लाख रुपये आणि ५० हजार रुपये किंमतीचे दागिनेही वेगवेगळी काररणे सांगून नेली. आता तिच्याजवळ एक छदामही नसल्याचे लक्षात येताच त्याने तिच्याकडे पाठ फिरवली आणि लग्नास नकार दिला. या विश्वासघातकी प्रियकराविरोधात अखेर तिने मुकुंदवाडी ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.अनिल हिरालाल मगरे (रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल आढे यांनी सांगितले की, पीडित ३१ वर्षीय महिला आणि आरोपी यांच्यात २००८ मध्ये ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्याने आरोपीने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तब्बल आठ वर्ष पीडितेसोबत त्याचे संबंध होते. पीडिता घटस्फोटित असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. आरोपीही विवाहित असून तो मुकुंदवाडी परिसरात आईवडिल आणि बहिणीसह राहतो. तोही पत्नीपासून वेगळा राहतो. त्याने खर्चासाठी आणि वेगवेगळ्या कारणासाठी पीडितेकडून वेळोवेळी २ लाख रुपये नेले. तिच्या गळ्यातील ५० हजाराचे दागिनेही नेले. तिच्याकडून लग्नासाठी आग्रह वाढू लागताच त्याने तिच्याकडे जाणे कमी केले. काही दिवसापूर्वी त्याने तिला चक्क वेश्या व्यवसायच करण्याचा सल्ला दिला. आपला प्रियकरच देह विक्रय करण्याचे सांगत असल्याने ती संतप्त झाली. यावरुन त्यांच्यात भांडण झाले. तेव्हा त्याने तिला आणि तिच्या मुलीलाही मारहाण केली. पोलीस आयुक्तांकडे धावमुकुंदवाडी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून सोमवारी ती थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटली. तिने तिच्यावर ओढावलेला प्रसंग त्यांना सांगितला. त्यानंतर आयुक्तांनी महिला पोलीस उपनिरीक्षकास बोलावून महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. महिला पोलीस उपनिरीक्षकाने तिच्याकडून सविस्तर फिर्याद नोंदवून घेतली. १८ आॅक्टोबर रोजी रात्री उशीरा मुकुंदवाडी ठाण्यात आरोपी अनिल मगरे विरूद्ध बलात्कार करणे, मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला.