शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

मुंबई-नागपूरच्या प्रवासादरम्यान धावत्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. रविवारी पहाटे पावणेपाच वाजता आधी अकोला, त्यानंतर अमरावती व नंतर नागपूर रेल्वे पोलिसांना

युवतीनेच दिली रेल्वे पोलिसांना माहिती : प्राध्यापकाविरूद्ध तक्रार नोंदविण्यास नकार प्रसन्न दुचक्के - अमरावतीमुंबई-नागपूरच्या प्रवासादरम्यान धावत्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. रविवारी पहाटे पावणेपाच वाजता आधी अकोला, त्यानंतर अमरावती व नंतर नागपूर रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नागपूर रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून अटक केली. चंद्रशेखर रामदास टेमढे (४५, रा. एसबीआय कॉलनी, वर्धा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.मुंबई येथील एक २० वर्षीय तरुणी नागपूर येथे उच्च शिक्षण घेत आहे. शनिवारी सायंकाळी ७.२० वाजता ती दुरांतो एक्स्प्रेसने मुंबई येथून नागपूरकडे जाण्यासाठी निघाली होती. रेल्वेतील कोच क्रमांक एस-७ मधील बर्थ क्रमांक १५ वरून तिचा प्रवास सुरू होता. तिच्या समोरच्या म्हणजे १६ क्रमांकाच्या बर्थवर चंद्रशेखर टेमढे नामक इसम प्रवास करीत होता. रात्रीचा प्रवास असल्याने एकांताची संंधी साधून सहप्रवाशाने तरूणीसोबत असभ्य वर्तन सुरू केले. प्रवासादरम्यान हा प्रकार सुरूच होता. त्यानंतर त्याने युवतीची छेड काढून अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. युवतीने तत्काळ या प्रकरणाची माहिती रेल्वेतील तिकीट तपासणिसाला दिली. त्यानंतर या घटनेची माहिती अकोला व अमरावती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. या दोन्ही स्थानकांवर आरोपीला अटक करण्यासाठी लगेच बंदोबस्तही तैनात करण्यात आला. मात्र, दुरांतो एक्स्प्रेस थेट नागपूरलाच थांबत असल्याने याची माहिती नागपूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. सकाळी ७ वाजता दुरांतो एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर पोहोचताच पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर टेमढे याला ताब्यात घेतले. त्याने तो वर्धा येथे प्राध्यापक असल्याची माहिती पोलिसांना दिली. युवतीने याप्रकरणी तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याने नागपूर रेल्वे पोलिसांनी अखेर प्राध्यापकाविरूद्ध भादंविच्या कलम ११२, ११७ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.