शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे यांची निवड

By admin | Updated: January 18, 2016 16:53 IST

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा खासदार रावसाहेब दानवे यांची निवड आज करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १८ -  भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा खासदार रावसाहेब दानवे यांची निवड आज करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यालयात रावसाहेब दानवे यांची दुस-यांदा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री असताना त्यांना तेथून प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्यांच्याच गळ्यात प्रदेशाध्यपदाची माळ घालण्यात आली.  रावसाहेब दानवे  हे जालन्याचे खासदार असून मराठा समाजाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन्ही बड्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
रावसाहेब दानवे यांनी रविवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा व इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा सादर केला. भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेंतर्गत राज्यात १ कोटी ५ लाख सदस्यांची नोंदणी करून, यापूर्वीच दानवे यांनी पक्षश्रेष्ठींकडून प्रशस्ती मिळविली होती. शिवाय वर्षभरात ७०० प्रशिक्षण शिबिरे घेऊन संघटना बांधणीसाठी केलेले प्रयत्नही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले.