शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेंच्या मुलाचा शाही विवाहसोहळा

By admin | Updated: March 3, 2017 10:09 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलगा संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 3 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलगा संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या शाहीविवाहसोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत अनेक दिग्गज उपस्थित होते. दानवेंनी मुलाच्या लग्नासाठी बीड बायपास रोडजवळील जवळपास 5 ते 6 एकर जमिनीवर अलिशान शामियाना उभारला होता. विशेष म्हणजे हा शामियाना उभारण्यासाठी राजस्थानमधील कारागिरांना बोलावण्यात आले होते. 
 
या लग्नात जवळपास 1 ते 1.50 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय, पाहुण्यांसाठी 30 ते 40  प्रकारचे पदार्थही बनवण्यात आले होते. भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोरवळकर यांनी सांगितले की, विवाहसोहळ्यात जवळपास 30 हजारहून अधिक लोकं सहभागी झाले होते. 
(स्वबळावरील सत्तेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू!)
 
या शाही विवाहसोहळ्यातील पाहुण्यांच्या यादीत राज्यातील व्हीव्हीआयपी, सरकारी अधिका-यांपासून ते औरंगबाद-जालना जिल्ह्यातील लोकांचाही सहभाग होता. या लग्नासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तैनात करण्यात आलेले पोलीस पथक ड्रोनच्या सहाय्याने लग्नस्थळावर नजर ठेऊन होते. 
(स्टिंग ऑपरेशनद्वारे व्यथा मांडणा-या बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळल्याने खळबळ)
 
दरम्यान, दानवे यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळ्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लग्नासाठी झालेल्या खर्चावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  जवळपास 5 ते 7  कोटी रुपये इतका खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. जालना शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना या लग्नासाठी दोन दिवसात 400 ते 500 टँकर पाणी रस्त्यांवर फवारण्यासाठी वापरण्यात आल्याचेही बोलले जात आहे. 
 
दरम्यान, या लग्नाकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासहीत पक्षातील बड्या नेत्यांनी पाठ फिरवली. केवळ शिवसेनेचे दोन स्थानिक नेत्यांनी लग्नात हजेरी लावली.