शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीखोरांना १० तासांत अटक

By admin | Updated: July 21, 2016 03:09 IST

खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना बुधवारी पोलिसांनी नवली फाटका जवळच्या एका कॉम्प्लेक्समधून अवघ्या दहा तासात अटक

हितेन नाईक,

पालघर- डहाणू येथील नहर या ज्वेलर्सच्या घरातून त्याच्या १२ वर्षीय दिया या मुलीचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना बुधवारी पोलिसांनी नवली फाटका जवळच्या एका कॉम्प्लेक्समधून अवघ्या दहा तासात अटक केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. ही माहिती पोलीस आधिक्षिका शारदा राऊत यांनी दिली.डहाणू येथे सचिन नहार याचे रमेश ज्वेलर्स हे दुकान असून ते डहाणू (मसोली) येथे रहातात. त्यांच्या घरात सर्व झोपले असतांना त्यांच्या दुकानात सहा वर्षा पूर्वी घरकाम करणारा शिवा भगत याने आपल्या चार साथीदारासह मंगळवारी रात्री सुमारे दीड वाजता बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून घरात प्रवेश केला. बाजूच्या खोलीत झोपलेल्या दिया हिच्या तोंडात ओढणी कोंबून व चाकू दाखवून‘ओरडलीस तर तुझे तुकडे तुकडे करीन असा दम दिला.’ तिला उचलून तिच्याच स्कूटीवर बसवून दोन आरोपी पालघरच्या दिशेने निघाले. यावेळी दियाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिच्या गळ्यावर चाकू ठेवण्यात आला होता. पहाटे भर पावसात तिला पालघरच्या नवली फाटका जवळील क्वीन पॅलेस कॉम्प्लेक्स येथील आरोपीच्या घरात आणून बाथरूममध्ये कोंडून ठेवले.दिया जवळ झोपलेल्या पाच वर्षाच्या तिच्या भावाने पहाटे रडत शेजारच्या खोलीत जाऊन आईला दिया नसल्याचे सांगितले. त्यानंतर डहाणू पोलीस स्टेशनमध्ये दिया बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. तिची सर्वत्र शोधा शोध सुरु असताना सकाळी ६.४५ वाजता दियाच्या आईच्या मोबाईल वर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला.दिया आमच्या ताब्यात असून पाच कोटी तात्काळ द्या,अन्यथा तिला ठार करण्यात येईल असे सांगण्यात आले. नंतर मुख्य आरोपी भगत हा सफाळे, वाणगाव येथून आपले ठिकाण बदलून मोबाईलद्वारे फोन करीत होता. या वेळी संभाषणा दरम्यान खंडणी मागताना आपल्याला हा आवाज ओळखीचा वाटत असल्याचे तिने आपल्या पतीला सांगितले आणि आपल्याकडे काम करणाऱ्या शिवा भगतचा आवाज असल्याची खात्री झाल्या नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.हे प्रकरण ५कोटींच्या खंडणीचे असल्याचे समजल्यावर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पालघर चे उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अशोक होनमाने, डहाणू चे पो.नि. शेखर डोंबे,पालघर चे पो.नि. संजय हजारे,सफाळे पोलीस स्टेशन चे सहा.पो.नि.मानसिंग पाटील, पीएसआय जय पाटील, हितेंद्र विचारे, किशोर सांगळे, धनुराम पाटील इत्यादीची सात पथके तैनात करण्यात आली होती. त्यांनी अचूक व्यूहरचनेच्या आधारे मुख्य आरोपीला स्टेशन बाहेर अटक केली. या वेळी पोलिसांनी त्याच्या घरात प्रवेश केला त्यावेळी घरात अन्य आरोपी पैकी लक्ष्मण आनंदू भगत (३५), कृष्ण कुमार राम आशिष राम (१९ ) पिंकू भिकू तांडेल मुख्य आरोपीची दुसरी पत्नी(२४) रा.वलसाड,यांच्या सह एका अन्य आरोपीला पोलिसांनी अटक केली. अवघ्या दहा तासात आपल्या मुलीची सुखरूप पणे सुटका केल्याने सचिन नहार व त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.>असे घडले आरोपींच्या अटकेचे नाट्यआरोपी हा पालघरमधील सूरज मल्होत्रा यांच्या गुरु कृपा कॅटरिंग मध्ये अनेक वर्षा पासून काम करीत असल्याची माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी सूरजला सहकार्य करण्याची विनंती केली आणि तो राहत असलेल्या क्वीन पॅलेसमध्ये त्याला पाठवले. सूरजने शिवाला हाक मारली. दरवाजाच्या की-होलमधून शिवाने त्याला पहिले व मागच्या दारातून पलायन करून त्याने पालघर स्टेशन गाठले. तिथे सूरज पोलिसांसोबत येत असल्याचे पाहून त्याने सूरजला फोन करून फोन का केल्याचे विचारले. आपल्याला अर्जंट आॅर्डर आल्याने तुझी गरज असल्याचे त्याने सांगितले. मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने पळ काढला.