शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

खंडणीखोर भाजप, सेनेला सत्ता देणार?

By admin | Updated: October 10, 2014 23:34 IST

अजित पवार यांचा सवाल : सुरेश पाटील प्रचारार्थ सभा

सांगली : महाराष्ट्रात १९९५ मध्ये भाजप-शिवसेनेच्या हातात सत्ता देऊन जनतेने अनुभव घेतला आहे़ खंडणीखोरांप्रमाणे कारभार करून महाराष्ट्राची पीछेहाट केली होती़ अशा खंडणीखोर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत मतदारांना केला़ तसेच केंद्रात सत्ता आल्यावर भाजपच्या नेत्यांनी हिंदुत्व सोडले असून, राज्यात सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनाही ते विसरतील, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लगावला़ राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगलीतील सभेत पवार बोलत होते़  ते पुढे म्हणाले की, १९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला संधी देऊन जनतेने पाहिले आहे़ खंडणीबहाद्दर अशीच या सरकारची ओळख होती़ विकासकामे करण्याऐवजी अधिकाऱ्यांना दमदाटी करून निधी हडप केला़ बदल्यांचा बाजार मांडला होता़  राज्य दिवाळखोरीत काढले़ साडेचार वर्षात केवळ जनतेची दिशाभूल केली़ सध्या मुंबई महापालिकेत शंभर कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे़ त्यांच्याकडे सत्ता असणाऱ्या महापालिकेत घोटाळे आहेत. तरीही प्रसारमाध्यमेही त्यांच्यावर काहीच टीका करीत नाहीत़ येडीयुरप्पांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाली, तरीही त्यांना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केले. असे हे नरेंद्र मोदी आहेत़ याकडे त्यांचे दुर्लक्ष आणि आमच्याबाबत मात्र खोटं पण रेटून बोलत आहेत़ सिंचन योजनांवर चाळीस हजार कोटींचा खर्च आणि ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होत आहे़ पंधरा वर्षातील महाराष्ट्राचे अंदाजपत्रक तीन लाख ७५ हजार कोटींचे आणि भाजपचे नेते आरोप करीत आहेत़ ११ लाख ८६ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा. त्यांच्या खोटेपणाचा आणि खोट्या जाहिरातींचा जनताच पंचनामा करीत आहे़ मतदार मतदानाद्वारेच मराठवाडा-विदर्भवाल्यांना जागा दाखवतील, असा टोलाही त्यांनी गडकरी, फडणवीस यांना लगावला़ माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडे विकासाचे व्हिजन नाही़ जनता त्यांना नाकारणार, याची त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते राष्ट्रवादी उमेदवाराबद्दल अपप्रचार करीत आहेत़ पण, गुलाल सुरेशअण्णांनाच लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)अजितदादा म्हणतात़़़मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा मोदींचा डावसत्तेत आल्यावर शंभर दिवसात ‘एलबीटी’ रद्दउध्दव ठाकरे तासाला बदलत असून राज ठाकरेंचे ‘राज’ बदललेसांगलीत गडबड केल्यास निकालानंतर वाईट परिणाम भोगावे लागतीलमहाराष्ट्राच्या योजना गुजरातला पळविल्यामोदी बारामतीत आले, पण धनगर आरक्षणावर बोलण्याचे टाळले