शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीविरोधी पथकाने एकाला घेतले ताब्यात

By admin | Updated: June 30, 2016 04:19 IST

पोलिसांना फारसे काही हाती लागले नसले तरी चार दरोडेखोर शेजारच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत

ठाणे : हिरादीप सोसायटीतील चेकमेट या कॅश मॅनजमेंट कंपनीमध्ये मंगळवारी पहाटे दरोडेखोरांनी जवळपास ९ कोटींची रोकड लुटून २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांना फारसे काही हाती लागले नसले तरी चार दरोडेखोर शेजारच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यानुसार, आता या फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वळवली आहेत. तसेच कंपनीतील सुमारे ८५ कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यांच्या जबानीतसुद्धा तफावत आढळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने रात्री उशिरा एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.अवघ्या काही मिनिटांत दरोडेखोरांनी दरोडा टाकून पोबारा केला. आपले कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येऊ नये म्हणून त्यांनी रेकॉर्डरच पळवून नेला. त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले होते. परंतु, जवळील एका इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोर पळून जाताना दिसत आहेत. त्यांच्या हातांत पैशांनी भरलेल्या पिशव्याही स्पष्ट दिसत आहेत. त्यावरून, हेच ते दरोडेखोर असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या दरोड्याच्या तपासासाठी वेगवेगळी १० पथके बनवली आहेत. त्यांना या सीसीटीव्ही फुटेजचा नक्कीच फायदा होणार असून त्यानुसार पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आहेत.या दरोड्याच्या अनुषंगाने पोलिसांनी बुधवारी कंपनीतील सुमारे ८५ जणांचे जबाब नोंदवले असून काहींच्या जबाबामध्ये तफावत आढळल्याची माहितीही समोर आली आहे. दुसरीकडे ज्या वेळेस कंपनीत दरोडा पडला, त्या वेळेस कंपनीत आॅनड्युटी १७ कर्मचारी होते, तरीदेखील हा दरोडा पडला कसा, असा सवालही आता उपस्थित झाला आहे. तसेच, कंपनीत कुठे सीसीटीव्ही बसवले आहेत, याची माहिती दरोडेखोरांना कशी झाली, याचाही तपास आता पोलीस घेत आहेत. याशिवाय कंपनीची आर्थिक परिस्थितीही तपासली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)>दहा पथके नेमण्यात आलीचेकमेट या कॅश मॅनेजमेंट कंपनीमध्ये मंगळवारी पहाटे दरोडा पडला. या दरोड्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी १० पथके नेमली आहेत. त्यापैकी एक पथक दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी नाशिकला गेले आहे. तर, उर्वरित पथकांमार्फत मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे शहरासह ग्रामीण भागात त्या दरोडेखोरांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.