शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ ‘मेडिकल’च्या अधिष्ठात्यावर खंडणीचा गुन्हा

By admin | Updated: November 30, 2014 00:52 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे यांच्यासह स्वच्छता निरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत चक्करवार

२० हजारांच्या मागणीचा आरोप : आवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची तक्रार यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे यांच्यासह स्वच्छता निरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत चक्करवार यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दस्तावेजावर स्वाक्षरीसाठी २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. यवतमाळ मेडिकलच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. डॉ. चक्कवार हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मनोरुग्ण विभागात आवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी एका चुकीच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केली. याचाच बागुलबुवा करून डोंगरे यांनी हस्तक स्वच्छता निरीक्षक उमेश गिरमेमार्फत २० हजार रुपयांची मागणी सुरू केली. तगादा लावूनही पैसे मिळत नसल्याने चक्करवार यांच्यावर एकतर्फी कारवाई करत त्यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी डोंगरे आणि त्यांच्या हस्तकाकडून आॅफर देण्यात येऊ लागल्या, अशी तक्रार डॉ. प्रशांत चक्करवार यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून सदर दोघांविरुध्द भादंवि ३८४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. आनंद डोंगरे हे ३० नोव्हेंबरला सेवेतून निवृत्त होत आहेत. मात्र खंडणीच्या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. यापूर्वीसुध्दा अशा प्रकारची वसुली केली जात होती. मात्र नोकरी वाचविण्यासाठी कोणीच तक्रार करण्यास पुढे येत नव्हते, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे. या प्रकरणात पोलीस तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)