शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

तुकोबांच्या रथाला वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण

By admin | Updated: June 25, 2017 20:10 IST

कविवर्य मोरोपंताच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 25) काटेवाडीत दाखल झाला.

ऑनलाइन लोकमतकाटेवाडी, दि. 25 - कविवर्य मोरोपंताच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 25) काटेवाडीत दाखल झाला. काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडले. या वेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. पूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जात असताना काटेवाडी येथील मेंढपाळाने मेंढ्यांची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण घातले होते. तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे. दुपारी काटेवाडी येथे धोतराच्या पायघड्या टाकून जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी तीन वाजता तात्यासाहेब मासाळ, हरिभाऊ महारनवर, संभाजी काळे, निवृती पाटोळे यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. या वेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर केला. या वैशिष्ट्येपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फी गर्दी केली होती.बारामती शहरातून रविवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर मोतीबाग, पिंपळी, लिमिटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत काटेवाडीत पालखी सोहळा विसावला. या वेळी पालखी दर्शन मंडपात पालखी नेण्यासाठी परिट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. ग्रामस्थांनी पालखीला खांदा दिला. या वेळी छत्रपती हायस्कूलच्या बँडपथकाने सुंदर लेझीम नृत्य केले. त्यानंतर वारकरी भाविकांनी गावामध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या पालखी सोहळ्याचे बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, सरपंच गौरी काटे, उपसरपंच जयश्री सुतार, वारकरी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एकनाथ काटे छत्रपतीचे संचालक प्रशांत काटे, पणन मंत्रालयाचे आधिकारी सुभाष घुले, श्रीजीत पवार यांनी स्वागत केले. काटेवाडी येथेल पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पताका, स्वागत कमानी, आकर्षक फुलांच्या माळानी सजावट केली होती. तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे पोलीस अधीक्षक बापू बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी तालुक्याच्या वतीने निरोप दिला. काटेवाडीच्या रिंगण सोहळ्यानतंर इंदापूर तालुक्यात भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा प्रवेश झाला.काटेवाडीच्या अंगणीमेंढ्या धावल्या रिगणीपायघड्या धोतराच्या, झाला गजर हरिनामाचा !