शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राणेंच्या काँग्रेसला कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:24 IST

निवडणुका हरल्या म्हणून इंदिरा गांधी घरी बसल्या नव्हत्या. त्या परत लोकांमध्ये गेल्या, जनसंपर्क वाढविला आणि परत विजयी झाल्या. आजच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणुका हरल्या म्हणून इंदिरा गांधी घरी बसल्या नव्हत्या. त्या परत लोकांमध्ये गेल्या, जनसंपर्क वाढविला आणि परत विजयी झाल्या. आजच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आला. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांचा अभिनंदनपर प्रस्ताव मांडला. काय योगायोग आहे आज ज्या विधिमंडळाच्या इमारतीत आपण चर्चा करत आहोत, त्या इमारतीचे १९ एप्रिल १९८१ साली इंदिरा गांधींनी उद्घाटन केले होते. याच वास्तूमध्ये त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव येणे हे सुखद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना राणे म्हणाले, आजच्या काँग्रेसने इंदिरा गांधींकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे. १९७७च्या निवडणुकीतील पराभवानंतर पत्रकारांनी जेंव्हा त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला तेंव्हा इंदिरा गांधी उसळून म्हणाल्या होत्या, ‘हार गये तो क्या हुआ? घर नहीं बैठेंगे, फिरसे जितेंगे!’ त्याप्रमाणे त्यांनी विजय खेचूनही आणला. पण आजचे काँग्रेस नेते पराभव झाला म्हणून घरी बसले आहेत. घरातून आॅफिस आणि आॅफिसमधून घरी असाच त्यांचा कार्यक्रम बनला आहे. रस्त्यावर उतरावे लागेल, लोकांमध्ये मिसळावे लागेल, असा सल्लाही राणे यांनी दिला. इंदिरा गांधी यांच्या धोरणांंमुळेच देश आज महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गारही राणे यांनी काढले.