शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारवाल्या राणेंना टिका करण्याचा अधिकार नाही, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 18:04 IST

जो चेंबूरच्या चित्रपटगृहाबाहेर तिकिटे विक्री करत होता. त्याला बाळासाहेबांच्या आर्शिवादामुळे सर्व पदे उपभोगायला मिळाली. या पदांच्या सहाय्याने भ्रष्टाचारातून अमाप माया जमवणा-या नारायण राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टिका शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.

औरंगाबाद, दि. १ : जो चेंबूरच्या चित्रपटगृहाबाहेर तिकिटे विक्री करत होता. त्याला बाळासाहेबांच्या आर्शिवादामुळे सर्व पदे उपभोगायला मिळाली. या पदांच्या सहाय्याने भ्रष्टाचारातून अमाप माया जमवणा-या नारायण राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टिका शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.

राज्यात वाढलेली महागाई आणि जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आला आहे. याविरोधात शिवसेना महिला आघाडीतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांतीचौकात निदर्शनांचे आयोजन केले आहे. या संदर्भात महिला आघाडीसह शिवसेना नगरसेवकांची सुभेदारी विश्रामगृहात बैठक झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे यांनी शिवसेनेला टार्गेट करणारे नारायण राणे यांच्यावर खरमरीत टिका केली. 

ते म्हणाले, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या म्हणण्यानुसार कोंबडीचोर असणारांना चपराशाचे मुख्यमंत्री केले. सर्व पदे दिली. तरीही शिवसेनशी गद्दारी केली. पुढे काँग्रेसमध्ये गेल्यावरही तेथील वरिष्ठ नेत्यांवर टिका केली. राणे हे हस्तक आहेत. त्यांनी आताही भाजपामध्ये जाण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र भाजपवाल्यांनी का घेतले नाही?  पैशाच्या जिवावर सर्व काही करता येते या भ्रमात राणे यांनी राहू नये, दोन वेळा शिवसेनेने पराभूत केल्याची आठवण ठेवावी.तसेच  भाजपाने त्यांना पक्ष प्रवेश न दिल्यामुळे ते सूद्धा अभिनंदनास पात्र आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

महागाई, जिएसटी विरोधात सोमवारी निदर्शनेशिवसेना महिला आघाडीतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता महागाई, जीएसटी विरोधात क्रांतीचौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये महागाई विरोधात आंदोलने करण्यात आली. आता औरंगाबादेत करण्यात येणार असल्याचे खा. खैरे यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीला महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, भाविसेचे निमंत्रक राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख नंदु घोडेले, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, सिद्धांत सिरसाठ, सचिन खैरे यांच्यासह महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, रंजना कुलकर्णी,  सुनिता देव, आशा दातार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेNarayan Raneनारायण राणे