शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

राणे, खोत, राज यांची नवी माळ, घटस्थापनेच्या मुहूर्तावर तीन पक्षांत तीन घडामोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 06:56 IST

नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेचा मुहूर्त गाठून गुरुवारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ नावाच्या नव्या संघटनेची कोल्हापुरात अंबाबाईच्या साक्षीने मुहूर्तमेढ रोवली.

मुंबई : नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेचा मुहूर्त गाठून गुरुवारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ नावाच्या नव्या संघटनेची कोल्हापुरात अंबाबाईच्या साक्षीने मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजचे अनावरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फॉलोअर्स वाढविण्याचा प्रारंभ केला.>नारायण राणेंनी काँग्रेस सोडली!मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देऊनही काँग्रेसने ते पाळले नाही. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,असे सांगत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा सभापतींकडे सुपुर्द केला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरटीका केली, तर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून आभार मानले.>सदाभाऊंची रयत क्रांती!स्वाभिमानी खा. राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बडतर्फ केलेले कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची कोल्हापुरात स्थापना केली. आपल्या संघटनेच्या माध्यमातून शेतकºयांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि युवकांना विधायक मार्गदर्शन केले जाईल, असे खोत यांनी सांगितले. खा. शेट्टी यांच्या एककल्ली कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली.>राज ठाकरे फेसबुकवर!मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजचे मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात अनावरण झाले. नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्याकार्यकाळात कसलाच बदल झाला नाही. थापेबाज मोदी सरकार आगामी सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याच्या प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केला.