शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेशिवाय राणे राहुच शकत नाहीत - वैभव नाईक

By admin | Updated: April 14, 2017 20:09 IST

काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची नारायण राणे यांची भूमिका ही स्वतःबरोबरच आपल्या मुलांच्या हितासाठीच आहे. प्रत्येकवेळी ते आपला स्वार्थ साधत असतात

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 14 : काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची नारायण राणे यांची भूमिका ही स्वतःबरोबरच आपल्या मुलांच्या हितासाठीच आहे. प्रत्येकवेळी ते आपला स्वार्थ साधत असतात. सत्तेशिवाय ते क्षणभरही राहुच शकत नाहीत हे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. अशी टिका करतानाच नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेला काहीही फरक पड़णार नाही. असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.  येथील विजय भवनमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख राजू राठोड, माजी नगरसेवक भुषण परुळेकर , भास्कर राणे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नाईक म्हणाले, नारायण राणे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आठ वर्षे सत्ता भोगली आहे. तर त्यांच्या मुलांना खासदार , आमदार बनविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ते दोन वेळा पराभूत होऊन देखील त्यानी हट्टाने विधान परिषदेची आमदारकी मागून घेतली आहे. तसेच विधानपरिषद गटनेते पदही मिळविले आहे. मात्र, काँग्रेसच्या माध्यमातून एवढे सर्व मिळून सुध्दा आता ते पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा विचार करीत आहेत. हा केवळ त्यांचा स्वार्थच आहे.जनतेशी त्यांना काही देणेघेणे राहिलेले नाही. सत्तेशिवाय नारायण राणे क्षणभरही राहु शकत नाहीत. त्यासाठीच त्यांचे हे पक्ष बदलाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना इडी मार्फत चौकशीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. आपल्या पाठीमागचा हा चौकशीचा ससेमिरा लवकर थांबावा यासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याचा त्यांचा विचार सुरु आहे. त्यासाठीच त्यांची सध्या सर्व धावपळ सुरु आहे. 12 वर्षापूर्वी त्यानी शिवसेना सोडली त्यावेळीही राज ठाकरे व त्यांची चर्चा झाली होती. सन 2009 च्या निवडणुकीनंतर शिवसेना सत्तेत येणार नाही.हे स्पष्ट झाल्यानेच त्यानी त्यावेळी शिवसेना सोडली होती. आता आगामी काळात पुन्हा काँग्रेस लवकर सत्तेत येणार नाही हे त्यांना समजल्यानेच त्यांची काँग्रेस पक्ष सोडण्याची हालचाल सुरु झाली आहे. मात्र, अहमदाबाद येथील घटनेनंतर त्यांची ही भूमिका जनतेसमोर उघड झाली आहे.त्यामुळे भविष्यात जे लोक काँग्रेसबरोबर रहातील त्यानी काँग्रेसमध्ये राणेंवर अन्याय झाला असे समजू नये. याउलट त्यानी काँग्रेसमध्येच रहावे. तर राणेंची साथ सोडून यापूर्वीच भाजप मध्ये प्रवेश केला आहे, त्यानीहि आपल्या भूमिकेवर ठाम रहात राणे विरोध कायम ठेवावा.हेच जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे आणि ही सिंधुदुर्गवासियांची इच्छा आहे.> राणेंच्या भाजप मध्ये जाण्याने शिवसेनेला काही फरक पड़त नाही. उलट राणे विरोधात असल्याने शिवसेना वाढत आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले असून सत्तेतही शिवसेना आली आहे. अनेक सत्तास्थाने शिवसेनेच्या हातात आली आहेत.त्यामुळे यापुढेही शिवसेना सामान्य जनतेसाठी सर्व स्तरावर विकासाची भूमिका कायम लावून धरेल.वेळप्रसंगी संघर्षही करेल. असेही आमदार नाईक यांनी यावेळी सांगीतले

> "तो" विषय आपल्याकडे अद्याप आलेला नाही! काही दिवसांपूर्वी नारायण राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. याविषयी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, " तो" विषय अद्याप आपल्याकडे आलेला नाही. त्यामुळे त्याविषयी कााही बोलण्यात अर्थ नाही.