शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅन्समवेअर व्हायरस’ने घातला जगभर धुमाकूळ

By admin | Updated: May 14, 2017 05:47 IST

‘रॅन्समवेअर व्हायरस’ म्हणून ओळखला गेलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यान शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला.

अनिल भापकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘रॅन्समवेअर व्हायरस’ म्हणून ओळखला गेलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यान शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला. ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला. सायबर सिक्युरिटी फर्म ‘अव्हास्ट’ने सांगितले की, भारतासहशंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले.या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली. अनेक हॉस्पिटल्समध्ये तर रुग्णांचे आॅपेरेशन आणि अपॉइंटमेन्ट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नसल्यामुळे डॉक्टरांवर कागद व पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.हा व्हायरस पसरू नये यासाठी रेनॉल्ट या फ्रेंच मोटार उत्पादक कंपनीस फरान्स व स्लोवेनियामधील कारखाने बंद ठेवावे लागले. अमेरिकेत ‘फेडएक्स’ या सामानाची वाहतूक करणाऱ्या बलाढ्य कंपनीलाही याच्या दुप्रभावापासून वाचण्यासाठी पावले उचलावी लागली. रशियात बँका आणि रेल्वे यंत्रणेच्या संगणक प्रणालीला या व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवला. तसेच जर्मनीतही दॉएच्च बाह्न या रेल्वे प्रशासनाला याचा फटका बसला.’रॅन्समवेअर’ म्हणजे काय ?‘रॅन्समवेअर’मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो.एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो की तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केला असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या ‘पेमेंट’ आॅप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासांत जर ही जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंटडाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही. अर्थात, तुमची आॅपरेटिंग सिस्टम चालूच होत नाही. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला ‘रॅन्समवेअर’ असे म्हणतात. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.>‘लोकमत’ने दिला होता इशारासोमवार ६ जून २०१६च्या अंकात ‘लोकमत’ने ‘रॅन्समवेअर’ या व्हायरसच्या संभाव्य धोक्याविषयी आपल्या वाचकांना इशारा दिला होता. तसेच या व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली होती. रॅन्समवेअरच्या संभाव्य हल्ल्याचे भाकीत देखील ‘लोकमत’ने केले होते.>काय काळजी घ्यावी ?सगळ्यात आधी तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपमध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमति अपडेट असणे आवश्यक आहे.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडून चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका.संगणक किंवा लॅपटॉपची आॅपरेटिंग सिस्टमही नेहमी अपडेट असावी; कारण अपडेटमध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन उपलब्ध असते. जसे की ‘रॅन्समवेअर’साठी पॅच मायक्र ोसॉफ्टने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमति डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्डडिस्कवर ठेवावा. म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकरने तुमच्याकडे पैसे मागितले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.