शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

रणदिवेंचा उल्लेख राहून गेला

By admin | Updated: January 7, 2016 02:16 IST

‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास जिवंत राहावा, या साठी मुंबईत उभारलेल्या दालनात दिनू रणदिवे यांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला

ठाणे : ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास जिवंत राहावा, या साठी मुंबईत उभारलेल्या दालनात दिनू रणदिवे यांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला, त्याबाबत मी जाहीर माफी मागतो. या दालनात त्यांचे साहित्य, त्यांच्या आठवणी आणि अनुभवांचा संग्रह ठेवण्यात येईल,’ असे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांच्या मुखपत्राचे संपादक उद्धव ठाकरे यांनी दिले. मराठी पत्रकार परिषद, ठाणे शहर दैनिक पत्रकार आणि जिल्हा पत्रकार संघाने बुधवारी गडकरी रंगायतनमध्ये पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना ठाकरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना कधी हल्ल्याची भीती वाटली नाही. त्यांच्या पत्रकारितेचा आदर्श आताच्या पत्रकारांनी घेतला, तर त्यांनाही हल्ल्याची भीती वाटण्याचे कारण नाही. पूर्वीचे पत्रकार लोकांनी शहाणे व्हावे म्हणून लिहायचे. आताचे काही पत्रकार मात्र मी स्वत: किती शहाणा आहे, हे दाखविण्यासाठी लिहितात. पत्रकारांची ही वाटचाल कशी स्वीकारायची, असा प्रश्न त्यांनी केला. पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. पत्रकारांनी समोरच्यावर टीका जरूर करावी, पण ती चूक दाखविणारी असावी. हाती असलेल्या शस्त्राने समोरच्यावर वार करून त्याला रक्तबंबाळ करू नये. आम्ही चुकलो तर आम्हाला आरसा दाखवा, मार्गदर्शक म्हणून आमच्या सोबत रहा, असे आवाहन त्यांनी केले. लहानपणापासून घरात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे वातावरण होते. तो प्रभाव आजही माझ्यावर कायम असून, पुढील पिढीला या चळवळीचा इतिहास कळावा म्हणूनच दालन उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनीच पथ्य पाळले, लिहिताना मर्यादांचे भान ठेवले, तर त्यांच्यावर कोण हल्ला करेल? पत्रकारांवर हल्ले होता कामा नयेत, या मताचा मी आहे, पण त्यांनी सीमा नीट पाळल्या, मर्यादा ओळखल्या, तर सर्व जण गुण्यागोविंदाने राहतील, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.विदर्भाला अनेक खाती मिळाली आहेत. मुख्यमंत्रीही विदर्भाचेच आहेत. त्यामुळे विदर्भाचा हवा तेवढा विकास करा. मात्र, महाराष्ट्र तोडू नका, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी मांडली. सत्काराला उत्तर देताना दिनू रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच बाळासाहेबांनी कशा रीतीने न डगमगता संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेला व्यंगचित्रे दिली, त्याचे दाखले रणदिवे यांनी यावेळी दिले. वृत्तपत्रांचे प्रॉडक्ट झाले असल्याने आता संपादकांच्या वर प्रॉडक्ट मॅनेजर आले आहेत. वाचकाला नेमके काय द्यायचे, मजकुराची जाहिरातीशी सांगड कशी घालायची, या बाबतचे सर्व निर्णय ते घेतात, पण त्यांनाही वृत्तपत्रांचे आणि पत्रकारितेचे ज्ञान देण्याची गरज आहे. तसे झाले, तरच पत्रकारितेची परंपरा कायम राहील, अशी भूमिका ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांनी मांडली. ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकाराला दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सुधीर कोऱ्हाळे यांना देण्यात आला, तसेच उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघाचा रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार भंडारा जिल्ह्याला देण्यात आला. पाकला इशारे देणारे मोदी दिसावेत मोदी यांनी निवडणुकीपूर्वी पाकला जे कडक इशारे दिले होते तसेच सडेतोड उत्तर ते आताही देतील अशी, आशा व्यक्त करत देशात घडणाऱ्या घटनांची नोंद जनता डोळसपणे घेत असते, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ठाकरे पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आतापर्यत आपला घातच केला आहे. पाकशी किती काळ चांगल्या भावनेने चर्चा करणार? परिस्थिती नियंत्रणात नसेल तर किती काळ चर्चेची वाट बघणार? लवकरात लवकर सडेतोड उत्तराची अपेक्षा आहे असल्याचे ठाकरे म्हणाले. राज्यातही फॉर्म्युल्याची आवश्यकतादिल्लीत वाहतूक कोंडीवर मात करण्याकरिता लागू केलेल्या सम-विषम फॉर्मुल्याचे स्वागत होत असून आपल्याकडेही वाहतूक कोंडी टाळण्याकरिता अशाच एखाद्या फॉर्म्युलाची आवश्यकता आहे, असे ठाकरे म्हणाले. सम-विषम क्रमांकाची वाहने विशिष्ट दिवशीच रस्त्यावर आणावीत या फॉर्म्युलाचे त्यांनी थेट समर्थन केले नाही. यावर मत मागवत असल्याचे मोघम उत्तर दिले.शिवसेना मंत्र्यांना कॉनव्हॉय हवापाकिस्तानी पत्रकारांना सुरक्षा दिली जाते तर आपल्या मंत्र्यांना का नको? मंत्री हे देखील जनतेचेच काम करीत आहेत. त्यांना कॉनव्हॉय द्यायचा की नाही हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र हे मंत्री जिथे जातील तिथे त्यांना सुरक्षा मिळावी, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.खैरे यांची पाठराखणशेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत शिवसेनेनी केली आहे. यापुढेही करणार आहे. त्यामुळे खैरे यांच्या घरातील विवाह सोहळ््यानिमित्त केलेल्या खर्चाचाा बाऊ करण्याची गरज नाही, असे सांगत ठाकरे यांनी खैरे यांची पाठराखण केली.अच्छे दिन नव्हे; चांगले दिवस येतीलसर्वांनी मिळून एकोप्याने काम केले तर अच्छे दिन नाही तर चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा टोमणाही ठाकरे यांनी मोदींना कार्यक्रमातील भाषणाच्या शेवटी दिला.