शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

राणेंच्या भाजपा प्रवेशात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 01:54 IST

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असली तरी त्यांचा पक्षप्रवेश सहजासहजी होण्याची शक्यता नाही.

- यदु जोशी,  मुंबईमाजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असली तरी त्यांचा पक्षप्रवेश सहजासहजी होण्याची शक्यता नाही. त्यांच्या भाजपा प्रवेशात अनेक अडथळेदेखील आहेत. राणे यांना भाजपात घेण्यासंदर्भात रा.स्व. संघाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. राणे यांनी आतापर्यंत सातत्याने भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघावर टीका केली आहे. शिवसेनेत असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केले होते. काँग्रेसमध्ये त्यांनी आतापर्यंत पक्षातील अनेक नेत्यांवर जाहीर टीकाही केली आहे. हा अनुभव लक्षात घेता ते भाजपात आल्यानंतर भाजपाच्याच नेतृत्वावर टीका करणार नाहीत याची हमी काय, असा सवालही संघ वर्तुळात केला जात आहे. राणे आणि भाजपाचे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तथापि, राणेंना भाजपात आणायचेच यासाठी गडकरी यांनी आपले वजन अद्याप वापरलेले नाही. पक्ष नेतृत्व, प्रदेश भाजपा आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राबाबत राजकीय निर्णयाचा विषय येतो तेव्हा गडकरी हे फडणवीस यांचे मत अंतिम असेल अशी भूमिका घेतात असा अनुभव याआधीही आलेला आहे. राणे यांचे गडकरींइतके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सख्य नाही. राणे विरोधी पक्षात असताना फडणवीस यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. तथापि, ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर राजकीय विरोधक म्हणूनच मुख्यमंत्री त्यांच्याकडे पाहत आले आहेत. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन विविध पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळा जपण्याची गडकरी यांची शैली आहे. तथापि, फडणवीस हे कधीही ‘पार्टी लाइन’ पलीकडे जात नाहीत. ते विरोधी पक्षात असताना शेवटची जवळपास पाच वर्षे कोणत्याही मंत्र्यांच्या दालनात जाऊन भेटत नसत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांना भाजपात आणून डोकेदुखी वाढविण्यापेक्षा आपापल्या भागात प्रभाव असलेल्या लहान नेत्यांना भाजपात आणण्यावर तीन वर्षांत फडणवीस यांनी भर दिला आहे. राणे हे त्यादृष्टीने पहिलेच अपवाद आहेत. ‘आपल्याला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले होते पण ते काँग्रेस पक्षाने पाळले नाही,’ अशी नाराजी स्वत: राणे यांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने व्यक्त केली होती. आता भाजपात येण्यासाठी ते काही अटी टाकतील आणि पुढे त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर भाजपा नेतृत्वाबाबतही नाराजी व्यक्त करतील हा धोका लक्षात घेऊनच ‘विनाअट पक्षात आल्यास तुमचे स्वागत करू,’ असे भाजपाकडून त्यांना सांगण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. संघ वर्तुळात काही आक्षेपराणे यांचे पुत्र आमदार नितेश आणि माजी खासदार नीलेश यांच्या संदर्भातही भाजपा आणि विशेषत: संघ वर्तुळात काही आक्षेप आहेत. उद्या राणेंच्या भाजपा प्रवेशाचा निर्णय झालाच हे आक्षेप आणि ते दूर करण्याची हमी त्यांच्याकडून घेतली जाईल, असेही मानले जाते.