शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

पोलीस दलासाठी घडताहेत रणरागिणी

By admin | Updated: January 16, 2017 01:24 IST

‘भारत केसरी’ हा किताब मिळविणारी सोनिका कालिरमण ही पहिली भारतीय महिला.

संजय माने,

पिंपरी- ‘भारत केसरी’ हा किताब मिळविणारी सोनिका कालिरमण ही पहिली भारतीय महिला. २००३ मध्ये हरियाणात गेलेल्या कुस्तीशौकीन दिनेश गुंड यांना तिची कुस्ती पाहण्याचा योग आला. हरियाणात मुली कुस्ती खेळतात. आपल्या येथे हे का घडू शकत नाही, हा विचार त्यांच्या मनाला शिवला. महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती या मर्दानी खेळाची परंपरा जोपासली गेली. त्या मातीत महिलांसाठी कुस्तीची तालीम सुरू करण्याचा निश्चय त्यांनी केला. २००६ मध्ये पुण्यातील श्रीक्षेत्र आळंदी येथे त्यांच्या मनातील संकल्पनेला मूर्त रूप आले. महिलांसाठी कुस्तीची तालीम साकारली. लेकीला तालमीत उतरवले. बघता बघता तालमीत मुलींची संख्या वाढत गेली. कुस्तीच्या आखाड्यात अंगाला माती लागलेल्या अनेक तरुणींनी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला अन् पोलीस दलात रणरागिणी होऊन समाजसेवेचा वसाही स्वीकारला आहे.हरियाणात जगदीश कालिरमण यांची कुस्ती पाहण्यासाठी वडमुखवाडीचे दिनेश गुंड आवर्जून जात असत. जगदीशची बहीण सोनिका हिची कुस्तीतील उत्कृष्ट कामगिरी पाहून ते भारावून गेले. मुलींसाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची प्रेरणा त्यांना तेथूनच मिळाली. अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले. मुलगी अंकिता हिच्यासह अनेक महिला कुस्तीपटू त्यांनी या तालमीत घडविले. तरुणींना पोलीस दलातही नोकरीची संधी मिळाली. विजया खुटवड, हेमलता घोडके,संपदा आस्वार,आसावरी झेंडे या धडाकेबाज महिला पोलीस अधिकारी आळंदीच्या तालमीतच घडल्या आहेत. त्यांच्यावर आत्मविश्वास,जिद्द, चिकाटी, संयम यासह व्यक्तिमत्त्वाचे अन्य पैलू येथेच पडले. यशस्वी खेळाडूंमुळे पुणे जिल्ह्यातील तरुणींना खेळाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले आहे. कुस्तीसारख्या मर्दानी खेळात महिलाही कमी नाहीत, हे हरियाणाच्या फोगट भगिनींनी पटकाविलेल्या पदकांनी सिद्ध झाले आहे. त्यावर ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तरुणींचा कुस्ती खेळाकडे कल वाढला आहे. कुस्तीतील तिसरी पिढीआळंदीतील तालमीत राज्याच्या विविध भागांतून मुली दाखल झाल्या आहेत. वडमुखवाडीतील गुंड कुटुंबाला कुस्ती या खेळाचा वारसा आहे. आशियाई स्पर्धेत पदक मिळविणारी अंकिता ही आमच्या तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी आहे, असे कुस्ती प्रशिक्षक दिनेश गुंड आवर्जून सांगतात. राष्ट्रीय स्तरावर तिने १२ सुुवर्णपदक मिळवले आहेत. मनीषा देवकर हिने राष्ट्रीय स्तरावर १२ सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. सोनाली तोडकरने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. अश्विनी मडवी,तनुजा अल्हाट, शीतल साठे, हर्षदा जाधव या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. कुस्तीकडे मुलींचा कल वाढल्याने आळंदीत त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. क्रीडा संघटनांचीही त्यासाठी मदत मिळते आहे.