शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रणरागिणींच्या हाती ‘सातारी एसटी’--लोकमत विशेष

By admin | Updated: February 20, 2015 23:31 IST

महिलांसाठी ११६ जागा राखीव : सातारा विभागासाठी होणार लवकर ३८७ चालकांची भरती

जगदीश कोष्टी -सातारा -एसटीत खाकी गणवेश घालून वाहकांना पाहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी कौतुक वाटत होते. मात्र, यंदा महिलांसाठीही शासन निर्णयसाठी तीस टक्के समांतर आरक्षण ठेवले आहे. त्यामुळे भरती होणार असलेल्या ३८७ पैकी महिलांसाठी ११६ जागा राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे लवकरच स्टिअरिंगवर महिला दिसायला लागणार आहेत. आरक्षित जागांवर महिला उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांमधून भरती केली जाणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ३१ विभागांतून चालक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सुमारे ७ हजार ६३१ जागांसाठी १६ फेबु्रवारीपासून आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. सातारा विभागात ३८७ चालकांची भरती होणार आहे. चालकपदासाठी बॅच बिल्ला काढण्यासाठी आठवी पास असणे बंधनकारक आहेत. त्यामुळे अनेक चालक केवळ बिल्ला मिळविण्यासाठी आठवीची परीक्षा देत होते. खासगी वाहनांवर कार्यरत असलेले अनेक चालक आठवी पास आहेत. त्यांच्याकडे बॅच बिल्ला आहे. या आधारे एसटीत भरती होऊन शासकीय नोकरी मिळविण्याचे अनेकांनी स्वप्न पाहिले आहे. मात्र, महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास केली आहे. त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. सेवक भरतीसाठी सातवी पास अट असली तरी बेरोजगारांची संख्या मोठी असल्याने बी.एस्सी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करत आहेत. त्यामुळे साहजिकच लेखी परीक्षेत गुण मिळवून त्यांची वर्णी लागत आहे. कोणत्याही पदावर नोकरी मिळवायची आणि स्पर्धा परीक्षा देत राहणे, हा फॉर्म्युला अनेकजण वापरत असल्याने शिपाईपदीही उच्चशिक्षित नोकरदार मिळत आहेत.एसटीच्या ताफ्यात शिवनेरी, व्हॉल्वो गाड्या सामील होत आहेत. या गाड्या संगणकीकृत आहेत. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा हाताळण्याचा, इंग्रजी भाषेचे किमान ज्ञान उमेदवारांना असणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळांनी शैक्षणिक पात्रता दहावी पास दिली असावी.- धनाजी थोरात, विभाग नियंत्रक, सातारा.सातारा विभागीय वाहतूक अधिकारी पदी यापूर्वी कार्यरत असलेल्या यामिनी जोशी या सफाईदारपणे एस.टी चालवत होत्या. विभागात केले जात असलेल्या चालक भरतीवेळी उमेदवारींची वाहन चालविण्याची चाचणी त्या घेत होत्या. यामिनी जोशी या सध्या नाशिक विभागात विभागनियंत्रक पदी कार्यरत आहेत. त्यामुळे एस. टी. महिला चालक बनण्यास सुरक्षीततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी महिलांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.