शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

रामतीर्थावर आज अखेरची शाहीपर्वणी

By admin | Updated: September 18, 2015 04:10 IST

सप्तर्षींचे स्मरण करत भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर रामघाटावरील गोदावरीत साधू-महंतांसह लाखो भाविक शुक्रवारी डुबकी घेतील आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकमधील

नाशिक : सप्तर्षींचे स्मरण करत भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर रामघाटावरील गोदावरीत साधू-महंतांसह लाखो भाविक शुक्रवारी डुबकी घेतील आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकमधील तीनही शाही पर्वणींचा अध्याय सुफळ संपूर्ण होईल. नाशिकमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या शाहीपर्वणीनिमित्त जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, महापर्वणीप्रमाणेच बंदोबस्ताचे नियोजन ‘जैसे-थे’ राहणार आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी पहिली पर्वणी २९ आॅगस्टला, तर द्वितीय महापर्वणी १३ सप्टेंबरला निर्विघ्न पार पडली. आता नाशिकला वैष्णव पंथियांची अखेरची व तिसरी पर्वणी शुक्रवारी होत असून, त्र्यंबकेश्वर येथील शैव पंथियांची अखेरची पर्वणी २५ सप्टेंबरला पार पडणार आहे.तिसऱ्या पर्वणीलाही तपोवनातील साधुग्राममधून लक्ष्मीनारायण मंदिरापासून तीनही प्रमुख आखाडे व खालशांची ब्रह्म मुहूर्तावर शाही मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत द्वितीय पर्वणीप्रमाणेच आखाड्यांचा क्रम राहील. मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा राहणार असून, मधोमध नेहमीप्रमाणे दिगंबर आखाडा चालणार आहे. सर्वांत शेवटी निर्वाणी आखाडा रामकुंडाकडे प्रस्थान करेल. महिलांची गर्दी वाढण्याची शक्यता भाद्रपद शुक्ल पंचमी अर्थात ऋषिपंचमीला सप्तर्षींचे पूजन केले जाते. प्रामुख्याने महिलांकडून पापक्षालनासाठी ऋषिपंचमीचे व्रत केले जाते. त्यामुळे शुक्रवारी ऋषिपंचमीला महिलांची रामघाटावर मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.रिते होऊ लागले साधुग्राम सिंहस्थ कुंभमेळ्याची धर्मध्वजा १४ जुलैला फडकल्यानंतर तपोवनातील सुमारे ३३५ एकर जागेत साधुग्राममध्ये प्रमुख तीन आखाड्यांसह त्यांच्या आठशेहून अधिक खालशांचा मुक्काम आहे. शुक्रवारी शेवटची शाहीपर्वणी असल्याने साधुग्राम परिसरात साधू-महंतांनाही आता परतीचे वेध लागले आहेत. अनेक खालसे व धार्मिक संस्थांनी, तर तिसऱ्या पर्वणीपूर्वीच साधुग्राम खाली केले आहे. साधुग्राममधील भाविकांचीही वर्दळ आता बऱ्यापैकी कमी झाली असून, अखेरची पर्वणी आटोपल्यानंतर साधुग्राम रिते व्हायला सुरुवात होईल.