शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यात "मातोश्री"वर जाणार नाहीत?

By admin | Updated: July 12, 2017 11:05 IST

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे शनिवारी ( 15 जुलै ) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, रामनाथ कोविंद हे ""मातोश्री""वर जाणार नाहीत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे  शनिवारी ( 15 जुलै ) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, रामनाथ कोविंद हे ""मातोश्री""वर जाणार नाहीत. त्यांच्या दौऱ्यासंबंधी जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये ""मातोश्री भेटी""चा उल्लेख करण्यात आलेला नाही.
 
रामनाथ कोविंद यांची एनडीएने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. यावेळी शिवसेना वगळता एनडीएमधील सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
 
यामुळे मुंबई दौ-यावर येणारे रामनाथ कोविंद ""मातोश्री""वर जाणार का? यावर सध्या चर्चा सुरू आहे.  मात्र, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात कुठेही मातोश्रीभेटीचा उल्लेख नाही. त्यामुळे ते मातोश्रीवर जाणार नसल्याचे स्पष्ट आहे.
आणखी बातम्या वाचा
ठाकरेंची अनुपस्थिती
कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणे टाळले होते. ही बाब भाजपाला खटकली होती. शिवाय ठाकरेंनी आपला प्रतिनिधी म्हणूनही कोणाला पाठविले नव्हते आणि हीच बाब भाजपा नेत्यांना सर्वात जास्त खटकली. एवढेच नाही तर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनीही यावेळी संसद संकुलात उपस्थित राहणे टाळले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी विमानाने दिल्लीला येणार होते. त्यांनी ठाकरेंना तुम्ही येणार असाल तर माझ्यासोबत येऊ शकता, असे सुचविले होते.
 
दरम्यान, याचा काहीही अर्थ काढू नये. आम्ही कोविंद यांचे नाव सुचविले असून, आम्ही त्यांना मतदान करणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. 
 
दरम्यान, कोविंद मुंबईत आल्यावर विमानतळावरुन ते थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये जातील. तिथे भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद साधतील. तर रामनाथ कोविंद हे सर्वच घटकपक्षांना भेटणार आहेत, असे भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. मात्र, मातोश्री भेटीसंदर्भात बोलण्यास त्यांनी टाळले.