शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रामजन्मभूमीचे तुकडे मान्य नाहीत- विहिंप

By admin | Updated: December 28, 2016 21:18 IST

अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 28 - अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे. या जमिनीचे तीन तुकडे होऊ देणे आम्हाला मान्य नाही. तेथील संपूर्ण वादग्रस्त जमीन ही मंदिरासाठीच देण्यात आली पाहिजे, अशी टोकाची भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. गुरुवारपासून नागपुरात विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाचे संयुक्त अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यासाठी नागपुरात आलेले आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय यांनी ही भूमिका मांडली.रामजन्मभूमीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने येथील वादग्रस्त जमिनीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय दिला होता. मात्र मूळ दावा हा या जमिनीचे तुकडे करण्यासंदर्भात नव्हताच. अशा स्थितीत जमिनीच्या तीन भागांना मान्यता कशी द्यायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र शासन राम मंदिराबाबत सध्या शांत असले तरी येत्या काळात निश्चित मंदिराची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.हिंदू संस्कृतीपासून दूर गेल्याने भ्रष्टाचारात वाढदेशात भ्रष्टाचार, दुराचार वाढीस लागला आहे. हिंदू संस्कृतीपासून दूर गेल्याने भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, असा दावा राय यांनी केला. हिंदूंनी अस्पृश्यतेच्या कुप्रथेपासून दूर जाण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्वच धर्माचे लोक एकेकाळी  हिंदूच होते. इस्लाम व ख्रिश्चन धर्मातील लोकांना त्यांच्या पूर्वजांची आठवण करून द्यावी लागेल. जर असे झाले तर देशातील अनेक समस्या दूर होतील, असेदेखील ते म्हणाले.