सोलापूर : अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहारातील प्रमुख संशयित आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम यास सोलापूरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.आर. कल्लापुरे यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. साठे महामंडळातील घोटाळा प्रकरणी सोलापुरातही कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी त्यास मुंबईतून ताब्यात घेऊन शुक्रवारी न्यायालयात हजर केले़ सुनावणीवेळी न्यायालय परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती़ (प्रतिनिधी)
रमेश कदमला पोलीस कोठडी
By admin | Updated: December 31, 2016 01:14 IST