शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात रमेश कदमच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: December 30, 2016 19:40 IST

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यास सोलापूर जिल्हा न्यायालयाने २ जानेवारी २०१७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 30 - अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यास सोलापूर जिल्हा न्यायालयाने २ जानेवारी २०१७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. आमदार रमेश कदम याची सोलापूर शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करून सोलापूर कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र कोर्ट दुपारी तीन वाजता सुरू होणार होते म्हणून शहर पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात रमेश कदमला जेल रोड येथील जेलमध्ये ठेवले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजता कदम याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा न्यायालयाने २ जानेवारी २०१७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी न्यायालय परिसरात मोहोळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. आमदार कदम याने मुंबई येथील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालयामार्फत सोलापुरातील सुनील सुभाष चव्हाण यांच्या नावाने धनादेश सोलापूर विकास महामंडळात पाठविला होता. ती रक्कम कदम याचा कार्यकर्ता सुनील बचुटे याने काढून वाहन खरेदी करून फसवणूक केली. याप्रकरणी तत्कालीन घोटाळेबाज अध्यक्ष कदम याला या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन कोठडीतून सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले़ सोलापूर येथील चौकशीनंतर कदम यांची पुन्हा मुंबई न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे, असे सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले.