शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदम यांची संपत्ती जप्त करा

By admin | Updated: March 11, 2017 04:20 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची १३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश येथील विशेष सत्र न्यायालयाने आज दिले. हा घोटाळा लोकमतने उघडकीस आणला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कदम हे या महामंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अनेक प्रकारचे घोटाळे केले. या प्रकरणात कदम यांच्यासह ११ जण अजूनही तुरुंगात आहेत. मात्र या घोटाळ्यात सामील असलेले तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बावणे अजूनही फरार आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीआयडीने आरोपपत्र आधीच न्यायालयात दाखल केले आहे. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश तनखीवाला यांनी आज कदम यांची १३५ कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. त्यात औरंगाबादजवळील शेतजमीन, बोरीवलीतील फ्लॅट, औरंगाबादमधील बंगला, पेडर रोड, मुंबई येथील भूखंड, माळशिरस तालुक्यातील (जि. सोलापूर) शेतजमीन, औरंगाबाद आणि मुंबईत आयसीआयसीआय बँकेतील रक्कम, मुंबईत कॅनरा बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, सिटी को-आॅपरेटिव्ह बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक आॅफ इंडिया, इंडियन बँकेच्या खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)त्या रकमेचे काय?राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ३८ मतदारसंघांमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी प्रत्येकी पाच कोटींचे वाटप साठे महामंडळामार्फत करण्यात आले. या रकमेत प्रचंड घोटाळे झाल्याचे सीआयडी चौकशीत आढळले होते. तथापि, त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई न करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.